मातेने दिला पावणेपाच किलो वजनाच्या बाळाला जन्म 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 12 डिसेंबर 2019

दारव्हा येथील नर्सिंग होममध्ये एका महिलेने चार किलो 800 ग्रॅम वजनाच्या बाळाला बुधवारी (ता. 11) जन्म दिला. डॉ. ऋचा पोटफोडे यांनी विनासिझेरियन प्रसूती केल्याने त्यांचे कौतुक केले जात आहे. महिला व बाळ दोन्ही सुखरूप आहेत. 

दारव्हा (जि. यवतमाळ) : येथील एका मातेने चार किलो 800 ग्रॅम वजनाच्या बाळाला जन्म दिला. बहुदा ही जिल्ह्यातील पहिलीच घटना असावी. यापूर्वी पुणे येथे एका मातने पाच किलो वजनाच्या बाळाला जन्म दिला होता. 

एकीकडे संपूर्ण महाराष्ट्रात सामान्य प्रसूतीची टक्‍केवारी फक्त 10 ते 15 टक्‍के आहे; तर सिझेरियनची टक्‍केवारी 85 ते 90 टक्‍के आहे. अशा स्थितीत पावणेपाच किलो वजनाच्या बाळाचा जन्म, सामान्य प्रसूती, महिला व बाळ दोन्ही सुरक्षित, याबाबी नातेवाईक व डॉक्‍टरांना सुखद धक्का देणाऱ्या आहेत. 

हेही वाचा - पुण्याला निघाली नागपूरची महिला, अन्‌ मनमाडनंतर तुटला संपर्क

गेल्या महिन्यात 22 प्रसूती 

दारव्हा येथील नर्सिंग होममध्ये गेल्या महिन्यात 22 प्रसूती झाल्या. त्यात केवळ चार प्रसूतींमध्ये सिझेरियन झाले. येथील सामान्य प्रसूतीची टक्‍केवारी 85 ते 90 आहे; तर सिझेरियन टक्‍केवारी केवळ 10 ते 15 टक्‍के असल्याची माहिती डॉ. ऋचा पोटफोडे यांनी दिली. 

अधिक वाचा - निराशा पदरी पडली अन्‌ युवतीने उचलले हे पाऊल

नातेवाईकांत आनंदाचे वातावरण 

तालुक्‍यातील अश्‍विनी कोरडे या महिलेला प्रसूतीसाठी येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. एवढ्या मोठ्या वजनाच्या बाळाचा सुखरूप जन्म झाल्याने नातेवाइकांत आनंदाचे वातावरण आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: yavatmal : five kilo weight baby of The birth at darvha