Yavatmal Flood: यवतमाळ जिल्ह्यात पावसाचे तांडव; उमरखेड तालुक्यात ११ तास मुसळधार,पाच मंडळांत अतिवृष्टी
Heavy Rain: यवतमाळ जिल्ह्यात मुसळधार पावसाने हाहाकार माजवला असून उमरखेड तालुक्यात ११ तास मुसळधार पाऊस झाला. नद्या-नाले तुडुंब भरल्याने शेकडो घरे व हजारो एकर शेती पाण्याखाली गेली आहेत.
यवतमाळ : जिल्हात अनेक भागात शनिवारी (ता.१६) ढगफुटीसदृश्य पाऊस झाला. नदी, नाल्यांना आलेल्या पुरामुळे उमरखेड, महागाव तालुक्यातील जवळपास तीनशे घरात पाणी शिरले. घाटंजी, यवतमाळ तसेच महागाव तालुक्यातील वेगवेगळ्या घटनांमध्ये तिघांचा मृत्यू झाला.