

Yavatmal Flood
esakal
आर्णी : दारव्हा तालुक्यातील दहेली येथील कुपटी नदीच्या पुलावर गुरुवारी (ता.३०) मध्यरात्री घडलेल्या दुर्घटनेचा अखेर अत्यंत दु:खद शेवट झाला. पुराच्या प्रवाहात वाहून गेलेल्या आई आणि तिच्या दोन मुलींचे मृतदेह अथक शोधमोहिमेनंतर शुक्रवारी (ता.३१) बोरी गोसावी येथे सापडले. या घटनेमुळे जिल्ह्यावर शोककळा पसरली आहे. या घटनेत माधवी खंदारे (४२), साची खंदारे (१७) आणि प्राची खंदारे (११) यांचा मृत्यू झाला. तर कुटुंबप्रमुख अविनाश खंडारे यांची थरारक सुटका करण्यात मदत पथकाला यश आले आहे.