
यवतमाळ : जिल्ह्यात सलग दुसऱ्याही दिवशी मुसळधार पावसाने हजेरी लावली. शुक्रवारी सकाळपासून दारव्हा, उमरखेड, महागाव, पुसद तालुक्यात पाऊस सुरू आहे. छोट्या, मोठ्या नाल्यावर पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. गुरुवारी एकूण २७. ५० मिमी पावसाची नोंद घेण्यात आली असून, २२ महसुली मंडळात अतिवृष्टीची झाली.