

दिनकर गुल्हाने, पुसद (जि. यवतमाळ), ता. १० : नांदेड-सेवाग्राम रेल्वे मार्गासाठी अधिग्रहीत करण्यात आलेल्या खर्षी येथील केशव तुकाराम शिंदे यांच्या शेतातील मौल्यवान रक्त चंदनाच्या झाडांसाठी मूल्यांकनाआधी एक कोटी रुपये मोबदला न्यायालयात जमा करण्याचा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिले. दहा वर्षानंतर शिंदे कुटुंबीयांच्या रक्त चंदनाच्या संघर्षाला यश मिळाले.