

Yavatmal Flood
esakal
बबलु जाधव
आर्णी: दारव्हा तालुक्यातील दहेली येथील कुपटी नदीच्या पुलावर 30 जुलैच्या मध्यरात्री घडलेल्या दुर्घटनेचा अखेर अत्यंत दुःखद शेवट झाला. पुराच्या प्रवाहात वाहून गेलेल्या आई आणि तिच्या दोन मुलींचे मृतदेह अथक शोधमोहीमेनंतर शुक्रवारी (ता.31) बोरी गोसावी येथे सापडले. या घटनेमुळे जिल्ह्यावर शोककळा पसरली आहे.