शिकाऊ डॉक्टरच्या हत्येमुळे एमबीबीएसचे विद्यार्थी संतप्त | Yavatmal | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शिकाऊ डॉक्टरच्या हत्येमुळे एमबीबीएसचे विद्यार्थी संतप्त

यवतमाळ : शिकाऊ डॉक्टरच्या हत्येमुळे एमबीबीएसचे विद्यार्थी संतप्त

sakal_logo
By
चेतन देशमुख

यवतमाळ : वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या आवारात शिकाऊ डॉक्टरची हत्या झाल्यानंतर सर्व प्रशिक्षणार्थी डॉक्टर, विद्यार्थी व परिचारक आक्रमक झाले आहे. त्यांनी कामबंद आंदोलन सुरु केले आहे. संतप्त विद्यार्थ्यांनी वैद्यकीय महाविद्यालयाचे प्रवेशद्वार बंद केल्याने रुग्ण व त्यांचे कुटुंबीय आत आणि बाहेर अडकले असून ते देखील संतप्त झाले. दरम्यान संतप्त विद्यार्थ्यांनी अधिष्ठातांचा पुतळा महाविद्यालयात जाळून ठिय्या आंदोलन सुरु केले.

हेही वाचा: कोथरुड : वंचितांसाठी काम करणारांचा सन्मान

आंदोलक विद्यार्थी व रुग्णांचे नातेवाईक आमनेसामने आल्याने तणावाची स्थिती निर्माण झाली. बुधवारी रात्रीचे सुमारास मूळचा ठाणे येथील डॉ अशोक पाल या एमबीबीएस च्या विद्यार्थ्याचा धारदार शस्त्राने महाविद्यालयाच्या परिसरात खून करण्यात आला. हा खून कुणी व का केला याचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसले तरी महाविद्यालय परिसरात सुरक्षेच्या दृष्टीने कुठलीही उपाययोजना केल्या जात नसल्याने अधिष्ठाता, पोलीस व जिल्हा प्रशासन या खुनासाठी जबाबदार असल्याचा आरोप वियार्थ्यांनी केला आहे.

वैद्यकीय महाविद्यालयात यापूर्वी देखील डॉक्टरांवर प्राणघातक हल्ले झाले आहेत. परिसरात सीसीटीव्ही, प्रकाश व्यवस्था, सुरक्षा रक्षक नाहीत, विद्यार्थिनीच्या वसतीगृहाला सुरक्षा भिंत नाही. याबाबत वारंवार सूचना देऊनही संबंधितांनी दुर्लक्ष केल्याने समाजकंटकांचा वावर याठिकाणी वाढला आहे. दुसरीकडे कामबंद आंदोलनामुळे रुग्णसेवा ठप्प पडली आहे.

loading image
go to top