भीषण स्थिती! यवतमाळमध्ये अंत्यसंस्कारासाठी लाकडांची टंचाई; पालिका घेणार गॅस आधारित शवदाहीनी

abc
abc

यवतमाळ : कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला आहे. मृत्यूचे प्रमाणही गेल्या काही दिवसांपासून वाढले आहे. परिणामी, स्मशानभूमीत मृतदेह दहनासाठी लाकडाची टंचाई निर्माण झाली आहे. त्यामुळे गॅसवर आधारित शवदाहीनी घेण्याचा प्रस्ताव सर्वसाधारण सभेसमोर ठेवला जाणार आहे.

शुक्रवारी (ता. नऊ) पालिकेची सर्वसाधारण ऑनलाइन सभा होणार असून या सभेत या विषयाला मंजूरी मिळाल्यानंतर शवदाहीनी खरेदीची प्रक्रिया केली जाणार आहे. जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. दररोज पॉझिटिव्ह रुग्णसंख्या वेगाने वाढत आहे. कोरोनामुळे मृत्यू होणाऱ्या रुग्णसंख्येत भर पडली आहे. मृत्यू पावलेल्या शवाचे दहन करण्यासाठी पांढरकवडा मार्गावरील स्मशानभूमीत अत्यंविधी केला जातो. 

गेल्या काही काळात पालिकेने लाकडांची व्यवस्था केली होती. आताही नागरिकांना आवाहन करून पालिका लाकडे गोळा करीत आहे. मात्र, काही दिवसांपासून लाकडांची टंचाई भासत आहे. दहनासाठी खर्च वाढला आहे. त्यामुळे गॅस आधारित शवदाहिनी घेण्याचा प्रस्ताव आहे. पर्यावरणाचा ऱ्हास न होता यातून समतोल राखल्या जाणार आहे. शिवाय येणारा खर्च कमी आहे. नावीन्यपूर्ण योजनेतून ही शवदाहिनी घेण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहे. 

यासाठी 90 लाख रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. प्रशासकीय मान्यतेसाठी हा विषय सर्वसाधारण सभेत ठेवला जाणार आहे. शुक्रवारी पालिकेची सभा होणार असून या सभेतील मंजुरीनंतर पुढील प्रक्रिया होणार आहे. 

सन 2020-21 करीता दीनदयाळ अंत्योदय योजना-राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान अंतर्गत शहरी बेघरांना नवीन निवारा बांधकामासाठी पालिकेच्या जागेस मान्यता देण्याचा विषय मंजुरीसाठी ठेवण्यात आला आहे. लोहारा येथील जागा या प्रकल्पासाठी निवडण्यात आली आहे. हा विषय मंजुरीसाठी सर्वसाधारण सभेसमोर आहे.

संपादन - अथर्व महांकाळ 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com