esakal | वाघिणीची शिकार करणाऱ्या दोघांच्या मुकुटबन पोलिसांनी आवळल्या मुसक्या; दोन फरार

बोलून बातमी शोधा

वाघिणीची शिकार करणाऱ्या दोघांच्या मुकुटबन पोलिसांनी आवळल्या मुसक्या; दोन फरार
वाघिणीची शिकार करणाऱ्या दोघांच्या मुकुटबन पोलिसांनी आवळल्या मुसक्या; दोन फरार
sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

झरी (जि. यवतमाळ) : झरी (जामणी) तालुक्यातील मुकुटबन वनपरिक्षेत्रातील मांगुर्ला वनपरिक्षेत्रातील वाघीणीची शिकार करणाऱ्यांना दोघाना मुकुटबन पोलिसांनी गजाआड केले असून दोघे फरार आहेत. पोलीस त्यांचा शोध घेत आहे. अटक केलेल्या दोघांपासून पोलिसांनी वाघिणीच्या हत्येसाठी वापरलेले शस्त्रे व वाघिणीचा एक पंजा जप्त केल्याची माहिती जिल्ह्याचे पालकमंत्री संदीपन भुमरे यांनी दिली. ते पांढरकवडा येथे शुक्रवारी (ता. ३०) रात्री 9 वाजता आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.

हेही वाचा: जेष्ठांच्या लसीकरणाचाच गोंधळ तरुणांना लस मिळणार कुठून?

यावेळी खासदार बाळू धानोरकर, जिल्हाधिकारी अमोल येडगे, जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. दिलीप पाटील भुजबळ, वनसंरक्षक रामाराव उपस्थित होते. पोलिसांनी आरोपिकडून वाघिणीच्या एका पंजाचे नखांसह, तीक्ष्ण धार असलेली बल्लंम जप्त करण्यात आले आहेत. या प्रकरणी 2 जणांना अटक करण्यात आली आहे. तर दोघे फरार आहे. ही कारवाई शुक्रवार ता. 30 रोजी करण्यात आली असून बातमी लीहीपर्यंत पांढरकवडा येथे कारवाई सुरूच होती.

पांढरकवडा वन विभाग अंतर्गत मुकुटबन वन परिक्षेत्रातील मांगूर्ला नियत क्षेत्र व कक्ष क्रमांक 30 मध्ये वाघिण मृत झाल्याची घटना ता. 25 ला घडली. त्यामुळे या घटनेने राज्यात खळबळ उडाली होती, परंतू या प्रकरणी आरोपी हुडकून काढण्यास वनविभागाला अपयश आल्याने या करिता पोलिस विभागाची मदत घेण्यात आली. त्यावरून पांढरकवडा वनविभागाअंर्गत मुकुटबन परिक्षेत्रातील मांगुर्ला नियतक्षेत्रातील राखीव वनकक्ष क्र . ३० मध्ये ता. 28 ला पोलीस अधीक्षक दिलीप भुजबळ, वन अधिकारी, एलासिबी पथक, मुकूटबन पोलीस, पाटण पोलीस अधिकारी यांनी वाघिणीच्या गुहेची पाहणी केली. त्यानंतर मुकूटबन पोलीस ठाणेदार यांना वाघिणीच्या आरोपींना पकडण्याचे आदेश देऊन यवतमाळला रवाना झाले.

हेही वाचा: धक्कादायक! नागपुरात महिनाभरात तब्बल २२८२ कोरोनाबळी; ग्रामीण भागातही रुग्णसंख्या अधिक

त्यावरून मुकूटबन पोलिस विभाग या बाबतित गोपनीय माहिती काढत होते. गोपनीय माहिती वरून पांढरवाणी येथील चौघांनी वाघिणीचे शिकार केल्याची माहिती मिळाली त्यावरून मुकूटबन पोलिसांनी एल सी बी पथक यवतमाळ, पाटण, शिरपूर, वणी येथील पोलिसांना पाचारण करून उपविभागीय पोलिस अधिकारी संजय पुज्जलवार व मुकूटबन पोलीस ठाण्याचे ठाणेदार धर्मा सोनुने यांच्यासह पोलीस कर्मचाऱ्यांनी सापळा रचून पांढरवाणी गावाला वेढा घालून पांढरवाणी येथील लेतू रामा आत्राम वय 45 वर्ष व अशोक लेतू आत्राम वय 25 वर्ष या दोन बाप लेकाना त्यांचे राहते गाव पांढरवाणी येथून अटक करण्यात आली. अशोकला पोलिस हिसका दाखवताच त्याने वाघिनिचे छाटलेल्या दोन पंज्या मधील एक पंजा पोलिसाच्या स्वाधीन केला आहे तर दूसरा पंजाच्या शोधात पोलिस आरोपीना ताब्यात घेवुन घटनास्थळाकडे रवाना झाली. यातील दोन आरोपी अजूनही फरार आहेत.

संपादन - अथर्व महांकाळ