Yavatmal: पोलिस अधिकार्‍यांच्या विभागीय बदल्या; काही बदल्यांना स्थगिती; पोलिस उपनिरीक्षक, सहाय्यक पोलिस निरीक्षकांचा समावेश

Amaravati Range Issues Transfer Orders: यवतमाळातील पोलिस निरीक्षक, उपनिरीक्षक आणि सहाय्यक पोलिस निरीक्षकांच्या बदल्यांसह काही आदेशांना स्थगिती देण्यात आली आहे.
Yavatmal

Yavatmal

esakal

Updated on

यवतमाळ: अमरावती परिक्षेत्र पोलिस महामंडळाने पोलिस निरीक्षक, पोलिस उपनिरीक्षक तसेच सहाय्यक पोलिस निरीक्षकांच्या बदल्यांचे आदेश रविवारी (ता. 31) निर्गमित केले. यात यवतमाळ शहर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक रामकृष्ण जाधव यांची बदली अकोला येथे करण्यात आली आहे. तर अकोला येथील श्रीराम लांबाडे यवतमाळ जिल्ह्यात आले आहे. आता शहर पोलिस ठाण्यात ठाणेदार म्हणून कुणाची नेमणूक केल्या जाईल हे वेळच ठरवेल.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com