खासगी गोदामावर छापा; सुमारे ३ लाखांचे तांदूळ, गहू जप्त

सूरज पाटील
Monday, 4 January 2021

 

यवतमाळ : रास्त दुकानात विक्री करण्यासाठी पुरविण्यात येणारा तांदूळ व गहूसाठा खासगी गोदामामधून जप्त करण्यात आला. शनिवारी (ता. दोन) पोलिस अधीक्षक डॉ. दिलीप भुजबळ यांच्या पथकाने पाटणबोरी येथे ही कारवाई केली.

हेही वाचा नव्या काँग्रेस प्रदेशाध्यपदासाठी नावाची चर्चा रंगताच नाना पटोलेंनी दिले सूचक उत्तर

शेख एजाज शेख इकबाल (वय 30) व जावेद युसूफ गोरी (वय 35, रा. पाटणबोरी) यांनी त्यांच्या गोदामामध्ये तांदूळ व गहूसाठा साठवून ठेवल्याची माहिती पथकाला मिळाली. त्यावरून खासगी गोदामामध्ये छापा टाकण्यात आला. यावेळी रास्त भाव दुकानात पुरविण्यात येणारा दोन लाख 90 हजार रुपये किमतीचा 14 हजार 450 किलो तांदूळसाठा व साडेसात हजार रुपये किंमतीचा पाच क्विंटल गहू आढळून आला. पोलिसांनी एकूण दोन लाख 97 हजार 500 रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला. शेख एजाज व जावेद गोरी या दोघांविरुद्ध पांढरकवडा पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला. ही कारवाई पोलिस अधीक्षक डॉ. दिलीप भुजबळ, अपर पोलिस अधीक्षक डॉ. खंडेराव धरणे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक गजानन पाटेकर, सचिन घुगे, अगस्ती पुंडे, अतुल मानेकर, प्रवीण वारंजे, ललीत जवधरे, राहुल मडावी, सागर गुजर, गजानन कुडमेथे, गजानन नव्हाते आदींनी केली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: yavatmal police raid on private warehouse