यवतमाळ : साखर कारखाना सुरू करण्यासाठी गडकरींची भेट | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Sanjay Deshmukh meet Nitin Gadkari regarding sugar factory

यवतमाळ : साखर कारखाना सुरू करण्यासाठी गडकरींची भेट

दारव्हा : तालुक्यातील बोदेगाव जय किसान साखर कारखाना कित्येक वर्षांपासून बंद आहे. त्यामुळे कामगार बेरोजगार झालेत. कारखाना पुन्हा सुरू झाल्यास रोजगारसंधी उपलब्ध होतील. तालुक्याच्या विकासाला चालना मिळेल. त्यामुळे हा कारखाना सुरू करण्यासाठी माजी राज्यमंत्री संजय देशमुख यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेत त्यांना निवेदन दिले.

तालुक्यातील बोदेगाव येथील कारखाना सुरू झाल्यास या भागातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना सुगीचे दिवस येतील. त्यामुळे राजकीय मतभेद बाजूला ठेवून सर्वसामान्य शेतकऱ्‍यांना दिलासा देण्यासाठी, बेरोजगारांना न्याय मिळवून देण्यासाठी हा ऊस कारखाना सुरू होणे अत्यंत गरजेचे आहे. यासाठी रविवारी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची माजी राज्यमंत्री संजय देशमुख यांनी त्यांच्या नागपूर येथील निवासस्थानी भेट घेतली.

यावेळी जय किसान साखर कारखाना सुरू करण्यासंदर्भात सकारात्मक चर्चा करण्यात आली. त्यानंतर कारखान्याशी निगडित सर्व अधिकाऱ्यांसमक्ष कारखाना सुरू करण्यासंदर्भात विविध बाबींवर चर्चा करण्यात आली. यावेळी संजय देशमुख यांच्यासह अ‍ॅड. राहुल ढोरे उपस्थित होते.

साखर कारखाना सुरू व्हावा, याकरिता केंद्रीय मंत्री गडकरी यांची भेट घेतली. याहीपुढे हा कारखाना लवकरात लवकर चालू व्हावा, यासाठी सर्व राजकीय मतभेद दूर ठेवत लवकर साखर आयुक्तांची भेट घेऊन तांत्रिक बाबी दूर करण्याचा प्रयत्न करू.

-संजय देशमुख माजी क्रीडा राज्यमंत्री

Web Title: Yavatmal Sanjay Deshmukh Meet Nitin Gadkari Regarding Sugar Factory Start

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..