Video : सच्चा शिवसैनिक, उद्धव ठाकरेंच्या मुख्यमंत्रिपदासाठी केला हा कठीण प्रवास

sanjay rathod
sanjay rathod

यवतमाळ : शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे राज्याचे मुख्यमंत्री व्हावे अशी राज्यातील शिवसैनिकांची मनोमन ईच्छा होती. मात्र, यवतमाळ जिल्ह्यातील एक शिवसैनिक असा आहे ज्याने उद्धव ठाकरेंसाठी खास नवस बोलला होता. यासाठी तो चक्क सायकलने तुळजापूरला रवाना झाला.

शिवसैनिक गिरीश व्यास 21 नोव्हेंबर 2019 रोजी यवतमाळवरून तुळजापूरच्या दिशेने रवाना झाले. यवतमाळ ते  तुळजापूर हा सायकल प्रवास त्यांनी केवळ 7 दिवसांत पूर्ण केला. तुळजापूरला पोहोचून त्यांनी भवानी मातेकडे मुख्यमंत्रिपदी उद्धव ठाकरे विराजमान व्हावे, अशी प्रार्थना केली. सोबत त्यांच्या मंत्रिमंडळात संजय राठोड यांचा सामावेश व्हावा, अशी मातेकडे मागणी केली.

व्यास यांचा हा नवस आई तुळजाभवानीच्या कृपेने पूर्ण झाला. त्यामुळे वनमंत्री संजय राठोड यांनी त्यांच्या घरापासून ते व्यास यांच्या घरापर्यंत सायकल वारी केली. घरी पोहोचून त्यांचा
सत्कार केला. यावेळी त्यांच्यासोबत शिवसेनेचे यवतमाळ जिल्हा प्रमुख पराग पिंगळे व राजेंद्र गायकवाड उपस्थित होते.

शेतकऱ्यांना दिलासा देणार
राज्यात आम्ही शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात जनतेची सेवा करू. शेतकऱ्यांना दिलासा देण्याचे कार्य करू.
- संजय राठोड, वनमंत्री

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com