
नेर, (जि. यवतमाळ) : बारावीच्या परीक्षेत अपेक्षेपेक्षा कमी गुण मिळाल्याने मानसिक तणावात आलेल्या १७ वर्षीय विद्यार्थिनीने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना यवतमाळ तालुक्यातील पांढुर्णा येथे सोमवारी (ता. ६) रोजी घडली. सदर विद्यार्थिनी नेर येथील एका हास्यकुलला शिक्षण घेत होती. त्यामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.