ही लढाई आपल्याला जिंकायचीच आहे... यवतमाळ, वर्धा कडकडीत बंद

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 22 मार्च 2020

वर्दळीचे रस्ते निर्मनुष्य असल्याने सर्वत्र शुकशुकाट दिसून आला. जनतेने जनतेसाठी पुकारलेला कर्फ्यु आहे. त्याला यवतमाळकारांची साथ मिळत आहे. आर्णी रोड, बसस्थानक चौक, दारव्हा रोड, धामणगाव या मार्गावर कायम वाहनांची गर्दी बघायला मिळते. मात्र आज एखादा अपवाद सोडल्यास चारचाकी वाहन दिसले नाही.

यवतमाळ : कोरोनाच्या संकटावर मात करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेला केलेल्या आवाहनानुसार सकाळपासून जनता कर्फ्युला जिल्हावासींची साथ मिळत आहे. आज सकाळपासून यवतमाळ शहरासह जिल्ह्यातील बाजारपेठ कडकडीत बंद आहे. आगारातून एकही बस सोडण्यात आली नाही.

वर्दळीचे रस्ते निर्मनुष्य असल्याने सर्वत्र शुकशुकाट दिसून आला. जनतेने जनतेसाठी पुकारलेला कर्फ्यु आहे. त्याला यवतमाळकारांची साथ मिळत आहे. आर्णी रोड, बसस्थानक चौक, दारव्हा रोड, धामणगाव या मार्गावर कायम वाहनांची गर्दी बघायला मिळते. मात्र आज एखादा अपवाद सोडल्यास चारचाकी वाहन दिसले नाही. विशेष म्हणजे, कुठेही पोलिसांना रस्त्यावर उतरावे लागले नाही. यवतमाळसह दारव्हा, दिग्रस, नेर, उमरखेड, पुसद, वणी, आर्णी, पांढरकवडा आदी तालुक्यासह जिल्ह्यात जनता कर्फ्युला साथ मिळत आहे. बोटावर मोजण्याइतकेच लोक जीवनावश्यक वस्तू खरेदी करण्यासाठी बाहेर निघाले. कोरोना विरुद्धची लढाई आपण जिंकू, असा आशावाद जनता कर्फ्युच्या माध्यमातून व्यक्त केला जात आहे.

वर्ध्यात शुकशुकाट, जनता कर्फ्युला साथ
वर्धा : कोरोना व्हायरसचा संसर्ग रोखण्याकरिता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या जनता कर्फ्युच्या आवाहनाला वर्धेत उत्तम प्रतिसाद मिळत आहे. दुपारपर्यंत सर्वेच रस्त्यांवर शुकशुकाट आहे. औषधी दुकाने वगळता इतर सर्वच बाजारपेठ बंद आहे. रविवार हा वर्धेचा आठवडी बाजाराचा दिवस असताना नागरिकांनी कर्फ्युला दिलेली साथ कोरोनाला हरविल्याशिवाय राहणार नाही, असे काही प्रशासकीय अधिकारी बोलत आहेत.

शाब्बास नागपूरकर, तुम्ही करून दाखवलं... शहरात १०० टक्के जनता कर्फ्यू

वर्ध्यात आतापर्यत कोरोनाचा एकही रुग्ण पॉझिटिव्ह मिळाला नाही. ही स्थिती कायम राहावी, याकरिता शासनाचे प्रयत्न सुरू आहे. याच खबरदारीअंतर्गत वर्ध्यात जनता कर्फ्युला उत्तम प्रतिसाद मिळाला. केवळ वर्धाच नाही तर तालुकास्थळ आणि ग्रामीण भागातही कर्फ्युची स्थिती होती. गावात नागरिकच काय जनावरेही घराबाहेर पडली नाही. ग्रामपंचायतीने दिलेल्या दवंडीनुसार आज गायीही चराईसाठी सोडण्यात आल्या नाही.

वर्ध्यात सर्वच मुख्य रस्ते, मोठे चौक, बसस्थानाक, रेल्वे स्टेशन, पेट्रोल पंप, ऑटो स्टँड, खासगी वाहतूक पूर्णतः बंद होती. चौकाचौकात पोलिसांचा चोख बंदोबस्त होता. वर्धेकर या आपत्तीवर मात करण्यासाठी सज्ज असल्याचे दिसून आले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: yavatmal wardha district closed for janta curfew