

vidarbha cold
sakal
नागपूर - प्रादेशिक हवामान विभागाने पुढील दोन दिवस संपूर्ण विदर्भात कडाक्याच्या थंडीचा ‘यलो अलर्ट’ दिल्यामुळे हुडहुडी आणखी वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. सोमवारच्या तुलनेत नागपूरच्या तापमानात आज अंशतः वाढ झाली, मात्र थंडीचा कडाका कायम होता. गोंदिया येथे लागोपाठ तिसऱ्या दिवशी विदर्भात नीचांकी तापमानाची नोंद करण्यात आली.