esakal | "डिजिटल थिकिंग'वर आज "यिन टॉक'
sakal

बोलून बातमी शोधा

"डिजिटल थिकिंग'वर आज "यिन टॉक'

"डिजिटल थिकिंग'वर आज "यिन टॉक'

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा
नागपूर : "सकाळ'च्या यंग इन्स्पिरेटर्स (यिन) यिनफेस्टच्या माध्यमातून "यिन टॉक'चे कार्यक्रमात "डिजिटल थिंकिंग' या विषयावर नागपुरात उद्या मंगळवारी (ता. 3) सकाळी 11 ला जे.डी. कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग ऍन्ड मॅनेजमेंटच्या सभागृहात हा कार्यक्रम घेण्यात येणार आहे. त्यात मार्केटिंग गुरू व यू-ट्यूबर साहिल खन्ना, "किलोबिटर्स'च्या सहसंस्थापक श्‍यामा मेनन, सोशल मीडिया तज्ज्ञ अवी आर्या तरुणांशी संवाद साधणार आहेत.
संगीत, चित्रकला, गप्पा व वैविध्यपूर्ण कलागुणांचा आविष्कार असलेला "यिनफेस्ट' नागपूरसह मुंबई, पुणे आणि औरंगाबादमध्ये आयोजित करण्यात आले आहे. "डिजिटल थिंकिंग' या विषयावर "यिन टॉक' शोमध्ये तरुणाईसोबत गप्पा रंगणार आहेत. राज्यभरात विविध कार्यक्रमात तरुणाईसमोर डिजिटल क्षेत्रातील अनुभव उलगडणार आहे. यावेळी या विषयावरील तज्ज्ञ डिजिटल क्षेत्रावर संवाद साधतील.
देशात मोठी डिजिटल क्रांती होत आहे. तरुणाईमध्ये डिजिटलविषयी बरेच आकर्षण आहे. यातून येणाऱ्या नवकल्पनांची बहुराष्ट्रीय कंपन्यांसह सामान्य नागरिकांना गरज आहे. डिजिटलचा वापर अधिक प्रभावी कसा करता येईल, त्यातून देशाला बळकट करण्यासाठी काय करता येईल, तरुणाईचे त्याबद्दलची भावना आणि त्यांच्यासमोर असलेले विविध प्रश्‍न यावरही या "यिन टॉक'मध्ये तज्ज्ञाकडून मार्गदर्शन करण्यात येईल.
यावेळी "यिन टॉक'मध्ये "इम्पॅक्‍टिंग डिजिटल स्पेस एज यू-ट्यूबर' या विषयावर मार्केटिंग गुरू व यू-ट्यूबर साहिल खन्ना, "इनकॉर्पोरेटिंग हेल्थ इन डिजिटल स्पेस' या विषयावर "किलोबिटर्स'च्या सहसंस्थापक श्‍यामा मेनन आणि "डिजिटल मार्केटिंग फॉर हॉस्पिटॅलिटी' या विषयावर सोशल मीडिया तज्ज्ञ अवी आर्या विद्यार्थ्यांशी संवाद साधतील. हा कार्यक्रम सर्वांसाठी विनामूल्य आहे. अधिक माहितीसाठी विकास मार्कंडे (9730848018), अमोल कडूकर (9270131580) यांचेशी संपर्क साधावा.
loading image
go to top