esakal | Lockdown : ‘तुम्ही कंटेन्मेंट झोनमध्ये आहात विसरलाय वाटतेय...’
sakal

बोलून बातमी शोधा

88888888.jpg

शहरात 7 एप्रिल रोजी पहिला कोरोना बाधित रुग्ण आढळला होता. तेव्हापासून 16 मेपर्यंत अकोल्यात 218 हून अधिक कोरोना बाधित रुग्णांची भर पडली आहे.

Lockdown : ‘तुम्ही कंटेन्मेंट झोनमध्ये आहात विसरलाय वाटतेय...’

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

अकोला  ः अकोल्यात कोरोना बाधितांचा आकडा दिवसागणिक फुगत आहे. यामुळे 30 हून अधिक प्रतिबंधित क्षेत्राची शहरात भर पडली आहे.या प्रतिबंधित क्षेत्रातील नागरिकांना बाहेर न येऊ देण्यासाठी परिसर सील करण्यात आला असला तरी शहरातील काही प्रतिबंधित क्षेत्रातील नागरिक ‘आपण कंटेन्मेंट झोनमध्ये आहोत’ हे विसरून खुशाल मुक्त संचार करीत असल्याचे चित्र आहे. मात्र, हे चित्र त्या परिसरासाठी गंभीर स्थितीकडे घेऊन जाणारे असेच आहे.

शहरात 7 एप्रिल रोजी पहिला कोरोना बाधित रुग्ण आढळला होता. तेव्हापासून 16 मेपर्यंत अकोल्यात 218 हून अधिक कोरोना बाधित रुग्णांची भर पडली आहे. आढळलेल्या रुग्णांचे परिसर सिल करण्यात आले असून, जेणे करून हा आजार बाहेर पडणार नाही याची दक्षता घेतली जात आहे. असे जरी असले तरी मात्र, शहरातील काही ठराविक प्रतिबंधित क्षेत्रातील नागरिक राजरोजसपणे या परिसरातील बॅरीगेट्स काढून मुक्त संचार करताना दिसत आहेत. हे चित्र पुढील काळासाठी भयावह स्थितीकडे घेऊन जाणार यात शंका नाही.

आवश्यक वाचा - अबब! सोन्यापेक्षाही महाग असलेल्या कस्तुरीच्या मातीची हवेली, तीही महाराष्ट्रातील या जिल्ह्यात, सुगंधासाठी पर्यटकही...

शिवणीतही मुक्तसंचार
गेल्या आठवड्यात शिवणी प्रभाग क्रमांक 14 मध्ये आढळून आलेल्या पॉझिटिव्ह रुग्णामुळे मुख्य रस्ता प्रशासनाच्या वतीने सिल करण्यात आला. परतु, पोलिसांकडून लावण्यात आलेल्या बॅरिगेट्स नागरिकांकडून हटवून, प्रतिबंधित परिसरात बाहेरून आत आणि आतून बाहेर नागरिकांचा मुक्तसंचार सुरू आहे. यामुळे इतर नागरिकांना कोरोनाचा संसर्ग होण्याची शक्यता नाकारता येत नाही. या परिस्थितीकडे गांभीर्याने पाहून दखल घेणे गरजेचे आहे.

पोलिसांना पुढे आड मागं विहिर
प्रतिबंधित क्षेत्रातील नागरिकांना घराबाहेर न पडू देण्यासाठी पोलिसांना तैनात करण्यात आले आहे. मात्र, तरीही मुजोर नागरिक बाहेर येताना दिसतात. अशा नागरिकांना अडविले असता त्या कर्मचाऱ्यांची वरिष्ठांकडे तक्रार केली जाते. तर अशाना रोखले नाही तर कामचुकापणा केला असल्याचा ठपकाही लावल्या जातो. तेव्हा पोलिसांना पुढे आड मांग विहिर अशा परिस्थितीला सामोरे जावे लागत आहे. 

loading image