प्रेयसीच्या कुटुंबीयांनी घातली सरकारी नोकरीची अट, मग विरहातून त्याने संपविले जीवन 

मोहन सुरकार 
Wednesday, 15 July 2020

शहरातील प्रभाग क्रमांक सातमधील मातामाय मंदिरजवळील वॉर्ड क्रमांक 10 मध्ये राहणाऱ्या नंदकिशोर कैलास गवळी (वय 26) या युवकाने घरी कोणी नसताना गळफास लावून आत्महत्या केली.

सिंदी (रेल्वे) (जि.वर्धा) :  त्याचे एका मुलीवर प्रेम जडले. तिच्याशीच लग्न करण्याच्या निश्‍चयाने त्याने तिचे घर गाठून लग्नाची मागणी केली. मात्र, तिनेच नकार दिल्याने हताश होऊन तो घरी परतला. आता आपल्या जीवनात जगण्यासारखे काही नाही, या विचाराने त्याने घरीच गळफास घेतला. यावेळी त्याने लिहून ठेवलेल्या चिठ्ठीतून सर्वच प्रकार उघड झाला. 

शहरातील प्रभाग क्रमांक सातमधील मातामाय मंदिरजवळील वॉर्ड क्रमांक 10 मध्ये राहणाऱ्या नंदकिशोर कैलास गवळी (वय 26) या युवकाने घरी कोणी नसताना गळफास लावून आत्महत्या केली. मंगळवारी (ता. 14) दुपारच्या सुमारास ही घटना घटना घडली. नंदकिशोरने गळफास घेण्यापूर्वी "सुसाईट नोट' लिहून ठेवली होती. सदर नोट त्याच्या मृतदेहाजवळून पोलिसांनी जप्त केली. यात प्रेमात मिळालेल्या नकारामुळे आत्महत्या करीत असल्याचा उल्लेख आहे. सदर घटनेची सिंदी पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली असून, पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठविला आहे. 

नंदकिशोर याने लिहून ठेवलेल्या चिठ्ठीत त्याचे तीन वर्षांपासून गावातील एका युवतीसोबत प्रेमप्रकरण होते. यात त्याने तिचे घर गाठत तिच्या कुटुंबीयांकडे लग्नाची मागणी घातली. घरच्यांनी मुलगा सरकारी नोकरीत असावा, अशी अट ठेवली. 

उघडून तर बघा - विश्‍वास बसेल का? मुख्यमंत्री उद्धवजी आमदार झाले मात्र निधी नाही, वाचा संपूर्ण प्रकार...
 

नंदकिशोर खासगी वाहनावर चालक म्हणून काम करायचा आणि आपले दुकान सांभाळायचा. त्याच्याकडे सरकारी नोकरी नव्हती. यामुळे तो हताश झाला. त्याला कुठलाही मार्ग दिसत नसल्याने त्याने अखेर गळफास लावून आत्महत्या केली. या घटनेची नोंद पोलिसांनी केली असून, पुढील तपास सिंदी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक प्रशांत काळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक वंदना सोनुने, बळवंत पिंपळकर करीत आहेत. 
 

आई-वडिलांना मोठ्या भावाकडे जाण्याची विनंती 

या चिठ्ठीत त्याने आई-वडिलांना मोठ्या भावाकडे राहण्यास जाण्याचा सल्ला दिला. त्यात दादा खूप चांगला आहे. मी काका झालो पण, पुतण्याला बघताही आले नाही, अशी खंतही व्यक्‍त केली होती. 

 

संपादन : अतुल मांगे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Young man commits suicide by refusing girlfriend