

pawan jaybhaye
sakal
किनगावराजा - सिंदखेडराजा तालुक्यातील लिंगा (देवखेड) येथील पवन जायभाये या तरुणाने विष प्राशन केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेचा व्हिडिओ समाजमाध्यमांवर झपाट्याने व्हायरल झाला असून, त्यात संबंधित तरुणाने किनगावराजाचे ठाणेदार आणि इतरांच्या त्रासाला कंटाळलो आहे. असे म्हणत विष प्राशन करतानाचा दृश्य स्पष्टपणे दिसत आहे. या घटनेमुळे स्थानिकांमध्ये तीव्र संताप आणि संतापजनक चर्चा सुरू झाली आहे.