चोर आला, चोर आला अन्‌ गेला जीव

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 20 डिसेंबर 2019

रामनगर पोलिसांनी घटनेची माहिती मिळताच घटनास्थळ गाठून मृतदेह ताब्यात घेतला. परिसराचा पंचनामा केला. याप्रकरणी रामनगर पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. तसेच चौघांना अटक करण्यात आली आहे.

चंद्रपूर : जिल्ह्यातील श्‍यामनगर, पागलबाबानगर परिसरात काही दिवसांपासून चोरींच्या घटनांची अफवा पसरली आहे. यामुळे नागरिकांत भीतीचे वातावरण आहे. चोरांपासून बचाव करण्यासाठी नागरिक स्वत: पहारा देत आहेत. पहारा देणाऱ्या लोकांशी एकाला चोर समजून बेदम मारहाण केली. यात त्याचा मृत्यू झाला. ही घटना गुरुवारी रात्रीच्या सुमारास घडली. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली. 

शहरातील श्‍यामनगर, पागलबाबानगर परिसरात मागील काही दिवसांपासून चोरीच्या घटनांची अफवा पसरली आहे. त्यामुळे नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले आहे. चोरांपासून बचाव करण्यासाठी काही परिसरातील नागरिक स्वत: सतर्क राहण्याचा प्रयत्न करीत आहेत. अशात पागलबाबानगरात गुरुवारी रात्रीच्या सुमारास पंकज लांडगे हा युवक आढळून आला. परिसरातील नागरिकांनी चोर समजून त्याला बेदम मारहाण केली. या मारहाणीत त्याचा मृत्यू झाला. 

क्लिक करा - देहविक्री व्यवसाय, प्रेयसी, तो अन्‌ खून

या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली. रामनगर पोलिसांनी घटनेची माहिती मिळताच घटनास्थळ गाठून मृतदेह ताब्यात घेतला. परिसराचा पंचनामा केला. याप्रकरणी रामनगर पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. तसेच चौघांना अटक करण्यात आली आहे. गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. चोरीच्या अफवेने एका युवकाचा जीव गेल्याने खळबळ उडाली आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Young man murdered in Chandrapur