देहविक्री व्यवसाय, प्रेयसी, तो अन्‌ खून

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 14 डिसेंबर 2019

विनयचे एका अल्पवयन युवतीसोबत गेल्या काही वर्षांपासून प्रेमसंबंध होते. मात्र, तिची जवळीक दुर्गेशसोबत वाढली. ही बाब विनयला खटकल्याने त्याने मारहाण केली. तसेच रूपाली हिच्या बांगरनगरातील देहविक्री व्यवसायात विनय अडसर ठरू लागला होता. मारहाणीमुळे दोघींचाही काटा काढण्याची संधी चालून आली. पाटीपुऱ्यायातील टोळक्‍याला कटात सामील करून विनयचा काटा काढला.

यवतमाळ : देहविक्री व्यवसायात असलेल्या प्रेयसीसोबत दुसरा तरुण दिसल्याने त्याला मारहाण करण्यात आली. मारहाणीचा बदला घेण्यासाठी टोळक्‍याने वाघापूर येथे तरुणाचा निर्घृण खून केला. याप्रकरणी गुरुवारी पुन्हा चौघांना गजाआड केल्याने खून प्रकरणाला देहविक्री व्यवसायाची किनार असल्याची बाब पुढे आली आहे. आतापर्यंत अटक करण्यात आलेल्या संशयित आरोपींची संख्या सात झाली आहे.

 

हेही वाचा -  मातेने दिला पावणेपाच किलो वजनाच्या बाळाला जन्म

 

विनय खुशाल राठोड (रा. शुभम कॉलनी) याचा खून मंगळवारी (ता. दहा) झाला. हल्ल्यात जखमी झालेल्या आकाश पुंडलिक वानखडे (रा. नेताजीनगर) याच्या तक्रारीवरून लोहारा पोलिसांनी पंधरा ते सतरा जणांविरुद्ध गुन्हा नोंदविला आहे. पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवून रोशन उर्फ कांडी पुरुषोत्तम प्रधान, प्रणय राजू मेश्राम (दोघेही रा. सुराणा ले-आउट पाटीपुरायवतमाळ), दुर्गेश विठ्ठल कठाणे (रा. दहेगाव ता. घाटंजी) या तिघांना अटक केली. न्यायालयाने तिघांना सोमवारपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.

अबब - चोरट्याकडे सापडले सात पिस्तूल ११८ काडतुसे

 

गुरुवारी शहर ठाण्याच्या डीबी पथकाने चौघांना अटक केली. राहुल सुरेश पाटील (रा. पाटीपुरा), पवन राजू पेठेवार (रा. घाटंजी), रूपाली, अल्पवयीन युवती (दोघी रा. बांगरनगर) अशी अटकेतील संशयितांची नावे आहेत. विनय याचे गेल्या काही वर्षांपासून अल्पवयीन मुलीसोबतसोबत प्रेमसंबंध होते. सोमवारी (ता. नऊ) ती घाटंजी येथील दुर्गेश कठाणेसोबत दिसली. त्यामुळे विनयने त्याला मारहाण केली. त्या मारहाणीचा बदला घेण्यासाठी दुर्गेश याने पाटीपुऱ्यातील टोळीशी संपर्क साधला.

 

क्लिक करा - मुलीची ममता : आईचा मृतदेह बघताच मुलीनेही घेतला जगाचा निरोप

 

मंगळवारी (ता. दहा) विनय हा वाघापूर ते लोहारा रोडवर उभा असताना पंधरा ते सतरा जणांच्या टोळक्‍याने घेराव घालून चाकू व धारदार शस्त्राने वार करून संपविले. विनयला वाचविण्यासाठी आकाश पुढे आला असता त्याच्यावरही मारेकऱ्यांनी हल्ला चढवून गंभीर जखमी केले. हा खून अत्यंत निर्घृणपणे केल्याने वादामागे काही तरी काळेबेरे असल्याची शंका होती. रूपाली, प्रेयसी व टोळक्‍याने कट रचून खून केल्याचे रहस्य उलगडले आहे. अद्यापही काही आरोपी फरार असून, पोलिस त्यांचा शोध घेत आहेत. संशयित चौघांना शुक्रवारी न्यायालयापुढे हजर करण्यात आले. त्यांना पोलिस कोठडी सुनावली आहे. पुढील तपास लोहारा पोलिस ठाण्याचे ठाणेदार सचिन लुले करीत आहे.

 

काय घडलं असेल - मित्रासोबत पहाटे फिरायला गेला अन्‌...

 

विनय ठरला होता अडसर

विनयचे एका अल्पवयन युवतीसोबत गेल्या काही वर्षांपासून प्रेमसंबंध होते. मात्र, तिची जवळीक दुर्गेशसोबत वाढली. ही बाब विनयला खटकल्याने त्याने मारहाण केली. तसेच रूपाली हिच्या बांगरनगरातील देहविक्री व्यवसायात विनय अडसर ठरू लागला होता. मारहाणीमुळे दोघींचाही काटा काढण्याची संधी चालून आली. पाटीपुऱ्यायातील टोळक्‍याला कटात सामील करून विनयचा काटा काढला.

"ती' पतीपासून विभक्त

एका कुंटणखान्याची मालकीण असलेली रूपाली ही पतीपासून विभक्त झाली आहे. त्यानंतर तिने आपले पाय रोवले. तिच्या कुंटणखान्यावर प्रतिष्ठांची ये-जा होती. जसराणा अपार्टमेंटला कुलूप असल्यास ग्राहक थेट तिच्याकडे जायचे, अशी माहिती सूत्रांनी दिली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Murder from the sale of sex in Yavatmal