esakal | अश्लील संभाषणाच्या बळावर तरुणीने मागितली खंडणी
sakal

बोलून बातमी शोधा

file photo

अश्लील संभाषणाच्या बळावर तरुणीने मागितली खंडणी

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नागपूर : तरुणीने व्यापाऱ्याशी फोनवर अश्‍लील संवाद आणि चॅटिंग केली. त्यानंतर रेकॉर्डिंग सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देत एक लाखाची खंडणी वसूल केली. पुन्हा खंडणीसाठी धमकी दिल्याने व्यापाऱ्याच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राजेंद्रनगरात राहणाऱ्या व्यावसायिकाचे बिल्डिंग मटेरियल सप्लायचा व्यवसाय आहे. ऑगस्ट महिन्यात त्यांना अनोळखी क्रमांकावरून तरुणीचा फोन आला. व्यावसायिकाने सुरुवातीला तरुणीशी बोलणे टाळले. परंतु, तरुणी वारंवार फोनवरून संपर्क करीत होती. हळूहळू तरुणीने व्यावसायिकाला अश्‍लील बोलण्यास प्रवृत्त केले. हे संभाषण तरुणीने रेकॉर्ड केले. तरुणीने एकदा व्यावसायिकाला फोनवर "तुझे अश्‍लील बोलणे रेकार्ड केले' असे सांगितले. हे रेकॉर्डिंग पत्नीला दाखवून सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी दिली.
यातून सुटका करण्यासाठी तरुणीने व्यावसायिकाला दोनदा 50 हजार रुपये असे एक लाखाची खंडणी मागितली. घाबरलेल्या व्यावसायिकाने तरुणीला पैसे दिले. यानंतर तरुणीने व्यावसायिकाला पुन्हा खंडणीसाठी फोन केला. व्यावसायिकाने टाळाटाळ केल्यावर तरुणीकडून त्यांच्या वडिलांना अश्‍लील संभाषणाबाबत सांगण्यात आले. व्यावसायिकाने थेट नंदनवन पोलिस ठाणे गाठून घडलेल्या घटनेची माहिती दिली. पोलिस निरीक्षक विनायक चव्हाण यांच्या सूचनेवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, तरुणीचा शोध सुरू केला आहे.

loading image
go to top