लहान भावाचा बत्त्याने खून करणारी "ती' तरुणी पोलिस कोठडीत 

सुरेंद्र चापोरकर
रविवार, 12 जुलै 2020

आई-वडील घरी नसल्याची संधी साधून निकिता ही 21 वर्षीय तरुणी गुरुवारी (ता. नऊ) घराबाहेर जाण्यास निघाली होती. त्यावेळी तीचा लहान भाऊ स्वराज गजानन तूपटकर (वय 10) घरी एकटाच होता.

अमरावती : घराबाहेर जाण्यास विरोध करणाऱ्या लहान भावाच्या खूनप्रकरणात अटक झालेल्या निकिताला जिल्हा न्यायालयाने सोमवारपर्यंत (ता. 13) पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. खोलापुरीगेट पोलिसांनी तिला शुक्रवारी (ता. 10) शहरातील सराफा परिसरातून अटक केली होती. 

आई-वडील घरी नसल्याची संधी साधून निकिता ही 21 वर्षीय तरुणी गुरुवारी (ता. नऊ) घराबाहेर जाण्यास निघाली होती. त्यावेळी तीचा लहान भाऊ स्वराज गजानन तूपटकर (वय 10) घरी एकटाच होता. त्याने निकिताला घराबाहेर जाण्यासाठी विरोध केला. त्यामुळे निकिताने दुपारी साडेबारा ते एक वाजताच्या सुमारास दत्तविहार कॉलनी, व्यास ले-आउट येथील घरी लहान भाऊ स्वराजचा लोखंडी बत्त्याने ठेचून खून केला व घराबाहेर परून गेली होती, असे पोलिसांनी सांगितले. 

अवश्य वाचा- `माझ्याशी लग्न कर अन् बायकोला हाकलून दे` प्रेयसीने तगादा लावल्याने प्रियकराने दिले विहिरीत ढकलून.... 

खोटे कारण सांगून तिने रात्रभर क्रांती कॉलनीत मैत्रिणीकडे आश्रय घेतला. शुक्रवारी (ता. दहा) सकाळी अकराच्या सुमारास मैत्रिणीच्या पतीने तिला सराफा बाजारपर्यंत आणून सोडले. तेथून पोलिसांनी निकिताला अटक केली. तिला चौकशीसाठी दत्त कॉलनीत नेले. घटनास्थळावरून काही वस्तू, रक्ताने माखलेले कपडे जप्त केले. निकिताची मैत्रीण व तिच्या पतीचे बयाण तपास अधिकाऱ्यांनी नोंदविले. प्राथमिक चौकशीत निकिताने भावाचा खून केल्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले.

अवश्य वाचा- घरातच उघडला होता त्याने बनावट विदेशी दारूचा कारखाना, अन् एक दिवस... 

लहान भावाचा खून प्रकणात पोलिस वेगवेगळ्या पद्धतीने तिची चौकशी करीत असताना तिच्या चेहऱ्यावर पश्‍चातापाचा लवलेशही दिसत नसल्याचे सूत्रांनी सांगितले. दरम्यान, शनिवारी (ता. 11) सकाळी पोलिसांनी तिला न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने तिला सोमवारपर्यंत (ता. 13) तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. 

संपादन ः राजेंद्र मारोटकर

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The "young woman" who killed her younger brother is in police custody