सैनिक मध्यरात्री पाणी पिण्यासाठी घरी गेला आणि पत्नीवर झाडल्या गोळ्या; स्वत:ही केली आत्महत्या

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 2 July 2020

घटनेची माहिती दारूगोळा भांडारतील व्यवस्थापनाने पुलगाव पोलिसांना दिली. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह तपासणीसाठी पाठवला. पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे. हत्या करण्यासाठी अजय सिंग याने रायफलचा वापर केल्याचे तपासात पुढे आले आहे.

वर्धा : ड्युटीवरून पाणी पिण्यासाठी घरी गेलेल्या सैनिकाने पाहिले पत्नीवर गोळ्या झाडल्या. तिच्या मृत्यूनंतर स्वतः गोळी झाडून आत्महत्या केली. यात पत्नीचा जागीच तर सैनिकांचा सावंगी रुग्णालयात मृत्यू झाला. ही घटना पुलगावाच्या दारुगोळा भांडारात रात्री दीड वाजताच्या सुमारास घडली. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अजय कुमार सिंग (वय 25) व प्रियांका कुमारी (वय 26) हे मूळचे बिहार येथील रहिवासी आहेत. त्याची ड्युटी पिळगाव येथील दारूगोळा भांडरात होती. दोन वर्षांपूर्वी त्याचा विवाह झाला होता. तेव्हापासून तो पत्नीसोबत पुलगावच्या दारूगोळा भांडारात राहत होता. बुधवारी रात्री तो कर्तव्यावर असताना पाणी पिण्यासाठी घरी गेला आणि पत्नी प्रियांका हीची हत्या कारून स्वतः आत्महत्या केली.

हेही वाचा - ती रडत रडत म्हणाली, 'तू पण तर मुलगी आहे, प्लीज माझा अश्‍लील व्हिडिओ नको काढू...'

घटनेची माहिती दारूगोळा भांडारतील व्यवस्थापनाने पुलगाव पोलिसांना दिली. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह तपासणीसाठी पाठवला. पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे. हत्या करण्यासाठी अजय सिंग याने रायफलचा वापर केल्याचे तपासात पुढे आले आहे. या सैनिकाने पत्नीची हत्या करून आत्महत्या का केली? याचे कारण शोधण्याचा प्रयत्न सुरू आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Husband commits suicide after wife's murder in Wardha