'काँग्रेस'चा टी-शर्ट घालून युवकाची आत्महत्या

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 17 October 2019

भारतीय जनता पक्षाचे 'पुन्हा आणूया आपले सरकार' टी-शर्ट घालून शेतकऱयाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना ताजी असतानाच आज (गुरुवार) काँग्रेसचे टी-शर्ट घालून युवकाने आत्महत्या केली.

बुलडाणा: भारतीय जनता पक्षाचे 'पुन्हा आणूया आपले सरकार' टी-शर्ट घालून शेतकऱयाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना ताजी असतानाच आज (गुरुवार) काँग्रेसचे टी-शर्ट घालून युवकाने आत्महत्या केली.

बुलडाणा जिल्ह्यातील धाड येथे सतीश गोविंद मोरे (वय 21) या युवकाने आज सकाळी नऊच्या सुमारास झाडाला दोरी बांधून गळफास घेऊन आत्महत्या केली. सतीश हा सुशिक्षीत बेरोजगार होता. त्याच्या घरी आई-वडील आणि एक भाऊ असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. सतीशने आत्महत्या केल्याचे समजल्यानंतर पोलिस घटनास्थळी दाखल झाले. सतीशचा मृतदेह बुलडाणा सामान्य रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवला असून, पुढील तपास धाड पोलिस करत आहेत.

दरम्यान, बुलडाणा जिल्हायातील या आठवड्यातील ही दुसरी घटना आहे. रविवारी (ता. 13) मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यावेळीच राजू ज्ञानदेव तलवारे (वय 35) या शेतकऱ्याने आत्महत्या केली होती. आत्महत्या केलेल्या या शेतकऱ्याच्या अंगावर 'पुन्हा आणूया आपले सरकार' असे लिहलेला भाजपचा टी-शर्ट होता. कर्जबाजारीपणामुळे या शेतकऱ्याने आत्महत्या केल्याचे माहिती पुढे आली आहे. येवला येथे शनिवारी (ता. 12) संध्याकाळी एका युवा शेतकऱयाने कर्जबाजाराला कंटाळून आत्महत्या केली. महाराष्ट्रात विधानसभा निवडणुक असून सर्वत्र प्रचारादरम्यान आश्वासनांना पाऊस पडत आहे, असे असातनाही शेतकऱयांच्या आत्महत्या थांबत नाहीत. यामुळे शेतकऱ्यांसाठी झालेल्या कर्जमाफीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

Image result for 'पुन्हा आणूया आपले सरकार' टी-शर्ट घालून आत्महत्या'पुन्हा आणूया आपले सरकार' टी-शर्ट घालून आत्महत्या


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: youth committed suicide by wearing congress t shirt at buldhana