युवक कॉंग्रेसकडून वनमंत्र्याच्या राजीनाम्याची मागणी 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 5 नोव्हेंबर 2018

भारतीय वन्यजीव अधिनियमाचे उल्लंघन करीत रात्रीच्या वेळी टी-वन वाघिणीची (अवनी) शिकार केल्याच्या आज युवक कॉंग्रेसतर्फे "टायगर कॅपिटल' म्हणून फलक लावलेल्या सिव्हील लाईन्स परिसरात आंदोलन करुन वन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या राजीनाम्याची मागणी केली.

नागपूर ः भारतीय वन्यजीव अधिनियमाचे उल्लंघन करीत रात्रीच्या वेळी टी-वन वाघिणीची (अवनी) शिकार केल्याच्या आज युवक कॉंग्रेसतर्फे "टायगर कॅपिटल' म्हणून फलक लावलेल्या सिव्हील लाईन्स परिसरात आंदोलन करुन वन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या राजीनाम्याची मागणी केली.

असगर अलीकडे शिकारीचा परवाना नसताना वाघिणीची शिकार कशी केली. भारतीय जनता पक्षाकडून कायम वाघाच्या संवर्धनाचे नारे दिले जात असताना टी वन वाघिणीला मारण्याचे आदेश का दिले. तीला बेशुद्ध करुन जेरबदही करता आले असते. वन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी त्यांनी केली. टी वन वाघिणीची शिकार हा खुनच आहे. यावरुन सरकार वन्यजीव वाचविण्यासही असमर्थ ठरत असल्याचे उघड झाल्यानेच आंदोलन करीत आहे. वनमंत्र्यांनी राजीनामा न दिल्यास आंदोलन तिव्र करण्यात येईल असा इशाराही युवक कॉंग्रेसचे दक्षिण महासचिव महेश बालपांडे आणि नागपूर युवक कॉंग्रेसचे उपाध्यक्ष कुणाल पुरी यांनी दिला आहे. 

अमिताभ बच्चन यांनी व्याघ्रदूत म्हणून माघार घ्यावी 
टी 1 वाघिणीला (अवनी) वन विभागान ठार मारल्याने महानायक अमिताभ बच्चन यांनी व्याघ्रदूत म्हणून माघार घ्यावी अशी मागणी वन्यजीव प्रेमी आणि पिपल्स फॉर ऑनिमनलच्या पदाधिकारी करिश्‍मा गिलानी यांनी आज केली. वाघांच्या संवर्धनासाठी अमिताभ बच्चन यांनी व्याघ्रदूताची जबाबदारी स्विकारली आहे. त्याला वनविभागाकडूनच तिलांजली दिली जात असल्याने व्याघ्रदूत म्हणून माघार घ्यावी अशीही मागणी केली आहे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Youth Congress Demand for resignation of Forest Minister