संजय रामकृष्ण पाते (वय ४०) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. त्याचा भाऊ राहुल रामकृष्ण पाते (वय ३०) जखमी झाला. त्यांचे शेजारी वसंत तुकाराम पाचबुद्धे (वय ६५) यांच्याशी अनेक वर्षांपासून वाद सुरू होता. अनेकदा परस्परविरुद्ध तक्रारीही झालेल्या आहेत. गुरुवारी सायंकाळच्या सुमारास शेजारीच असलेल्या बाभळीच्या झाडाच्या फांद्या छाटल्यावरून वसंत पाचबुद्धे व संजय पाते यांच्यात वाद झाला.
धामणगाव रेल्वे (जि. अमरावती) : अनेक वर्षांपासून असलेल्या वादाचे पर्यवसान भीषण हाणामारीत होऊन एका युवकाचा खून तर, दुसरा गंभीर जखमी झाला. तालुक्यातील वसाड या गावी ही घटना घडली. खुनाच्या घटनेमुळे निर्माण झालेला तणाव पोलिसांच्या उपस्थितीमुळे निवळला.
संजय रामकृष्ण पाते (वय ४०) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. त्याचा भाऊ राहुल रामकृष्ण पाते (वय ३०) जखमी झाला. त्यांचे शेजारी वसंत तुकाराम पाचबुद्धे (वय ६५) यांच्याशी अनेक वर्षांपासून वाद सुरू होता. अनेकदा परस्परविरुद्ध तक्रारीही झालेल्या आहेत. गुरुवारी सायंकाळच्या सुमारास शेजारीच असलेल्या बाभळीच्या झाडाच्या फांद्या छाटल्यावरून वसंत पाचबुद्धे व संजय पाते यांच्यात वाद झाला.
अधिक माहितीसाठी - बाळाच्या घाईने पती-पत्नी भरपावसात घराकडे निघाले; अन् नियतीने डाव साधला
त्यातून झालेल्या हल्ल्यात संजय पाते व राहुल पाते हे दोघे गंभीर जखमी झाले होते. दोन्ही जखमींना मारहाण करणारे वसंत पाचबुद्धे व त्यांच्या दोन्ही मुलांनी स्वतःच्या ऑटोमध्ये मंगरूळ दस्तगीर पोलिस स्टेशनला नेले. त्यांना अमरावतीच्या जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान संजय यांचा मृत्यू झाला.
मंगरूळ दस्तगीर पोलिस ठाण्यात खुनासह ॲट्रॉसिटी ॲक्टअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वृत्त लिहिस्तोवर मृत संजय पाते याचा मृतदेह उत्तरीयतपासणीनंतर कावली गावी यायचा होता. गावात परिस्थिती तणावपूर्ण असून, मंगरूळ दस्तगीर पोलिस स्टेशनचे ठाणेदार श्याम वानखडे यांच्यासह पोलिस प्रशासन परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे.
असे का घडले? - तो रडकुंडीस येऊन म्हणतो, दादाऽऽ दादाऽऽ रिक्षात बसा ना; हृदय हेलावून टाकणारा संघर्ष
घटनेनंतर परिस्थिती नियंत्रणात
खुनाच्या घटनेनंतर कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी पोलिस प्रशासन सतर्क झाले आहे. उपविभागीय पोलिस अधिकारी सोमनाथ तांबे यांनी तातडीने घटनास्थळाला भेट दिली. सध्या या गावाची परिस्थितीत नियंत्रणात आहे.
संपादन - नीलेश डाखोरे