esakal | भरधाव ट्रकपासून वाचण्यासाठी दुसऱ्या ट्रकचा आडोसा घेतला, पण दुर्दैवाने झाला मृत्यू
sakal

बोलून बातमी शोधा

youth died in truck accident in wani of yavatmal

मारोती दत्तू वरवाडे (वय 24), असे मृत तरुणाचे नाव असून, तो शिरपूर येथील रहिवासी आहे. वाहनचालक म्हणून डीटीसी कंपनीत कामाला होता. उकणी खदाणीमधून पावती घेऊन चेक पोस्टकडे जात असताना समोरून भरधाव ट्रक येताना दिसला.

भरधाव ट्रकपासून वाचण्यासाठी दुसऱ्या ट्रकचा आडोसा घेतला, पण दुर्दैवाने झाला मृत्यू

sakal_logo
By
तुषार अतकारे

वणी (जि. यवतमाळ) : तालुक्‍यातील उकणी चेक पोस्टजवळ भरधाव येणाऱ्या ट्रकपासून वाचण्याचा प्रयत्न करणारा 24 वर्षीय तरुण दुसऱ्या ट्रकच्या चाकाखाली चिरडला गेल्याने घटनास्थळीच ठार झाला. ही दुदैवी घटना बुधवारी (ता.2) सकाळी 11.45 वाजेच्या सुमारास घडली.

हेही वाचा - सव्वा महिन्याच्या बाळाच्या खुनाचे रहस्य कायम; कुटुंबीयांनी पित्याला दिली घटनेची माहिती

मारोती दत्तू वरवाडे (वय 24), असे मृत तरुणाचे नाव असून, तो शिरपूर येथील रहिवासी आहे. वाहनचालक म्हणून डीटीसी कंपनीत कामाला होता. उकणी खदाणीमधून पावती घेऊन चेक पोस्टकडे जात असताना समोरून भरधाव ट्रक येताना दिसला. हा ट्रक अंगावर येईल, या भीतीने मारोतीने रस्त्याच्या कडेला उभा असलेल्या ट्रकच्या (क्रमांक एमएच 34 बीजी 4565) मागील दोन चाकांचा आडोसा घेत असताना त्या ट्रकचालकाने अचानक वाहन सुरू केले. त्यात मारोती मागील चाकात चिरडला गेल्याने घटनास्थळीच त्याचा मृत्यू झाला. या घडलेल्या अनपेक्षित घटनेमुळे एकच खळबळ उडाली. त्या परिस्थितीचा फायदा घेत वाहनचालक घटनास्थळावरून फरार झाला आहे. याप्रकरणी शिरपूरचे ठाणेदार सचिन लुले यांच्या मार्गदर्शनाखाली प्रमोद जुणूनकर व संजय खांडेकर पुढील तपास करीत आहेत. या घटनेनंतर शिरपूर येथील जनतेमधून हळहळ व्यक्त केली जात आहे.

हेही वाचा - स्मार्ट प्रसाधनगृहाची योजना रखडली, २६ पैकी फक्त सहाचे...

loading image
go to top