esakal | कालव्यात बुडून युवकाचा मृत्यू
sakal

बोलून बातमी शोधा

File photo

कालव्यात बुडून युवकाचा मृत्यू

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

धाबा (जि. चंद्रपूर) : गोंडपिपरी तालुक्‍यातील धाबा येथील तलावाचा कालव्यात मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. बंडू बापू सोयाम, असे मृताचे नाव आहे. मृत्यूचे कारण अद्याप उलगडले नाही. मोठा तलाव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या तलावाचा कालव्यात धाबा येथील बंडू बापू सोयाम या तरुणाचा मृतदेह आढळून आला. शनिवारी रात्रीपासून बंडू सोयाम बेपत्ता होता. कुटुंबीयांनी शोधाशोध केली असता रविवारी (ता. 1) त्याचा मृतदेह कालव्यात सापडला. दरम्यान धाबा पोलिसांनी घटनास्थळ गाठून चौकशी सुरू केली आहे.

loading image
go to top