कारंजा - भाजीपाला पिकाला सिंचन करण्याकरिता तरुण शेतात गेला असता विद्युत प्रवाह खंडित झालेला दिसल्याने विजेचा प्रवाह सुरळीत करण्यासाठी विद्युत खांबावर चढल्यावर जिवंत विद्युत तारेस स्पर्श होऊन विद्युत खांबावरून खाली पडल्याने एका २० वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला.
ही दुःखद घटना कारंजा तालुक्यातील पिंप्री फॉरेस्ट शेतशिवारात सोमवारी १० मार्च रोजी सकाळच्या दरम्यान घडली. विशाल गोरख राठोड (वय-२० वर्ष) असे मृत्यू पावलेल्या तरुणाचे नाव असून तो पिंपरी फॉरेस्ट येथील रहिवासी होता.
सूत्रांच्या माहितीनुसार सोमवारी सकाळी तो एकाला शेतशिवारात शेतात भाजीपाला पिकाला पाणी देण्याकरिता गेला असता विद्युत प्रवाह सुरळीत नसल्याचे त्याला दिसून आले. त्यामुळे तो विद्युत प्रवाह सुरळीत करण्याकरिता शेतातील विद्युत खांबावर चढला आणि तेथे त्याला जिवंत विद्युत तारेचा स्पर्श झाल्याने विद्युत खांबावरून खाली पडून त्याचा मृत्यू झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
घटनेची माहिती ग्रामीण पोलिसांना मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन तरुणाचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी कारंजा उपजिल्हा रुग्णालयात आणला. दरम्यान दाखल फिर्यादीवरून पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद घेतली असून प्रकरणाचा पुढील तपास ठाणेदार प्रवीण खंडारे यांच्या मार्गदर्शनात एएसआय विनोद महाकाळ, ग्रामीण पोलीस करीत आहे.
कलम १९४ बिएनएस अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मृतक युवकाच्या वडिलांचाही अपघाती मृत्यू झाल्याने मृतक तरुण हा कुटुंबातील एकमेव कमावता व्यक्ती होता. मृत्यूपश्चात त्याच्यामागे आई आणि बहीण आहे. मुलाच्या निधनाने आई आणि बहिणीसह गावावर दुःखाचा डोंगर कोसळला असून सर्वत्र हळहळ व्यक्त केल्या जात आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.