esakal | शेतात सुरू होते सोयाबीनची गंजी लावण्याचे काम; अंगावर वीज कोसळल्याने युवकाचा मृत्यू
sakal

बोलून बातमी शोधा

Youth dies in lightning strike at Aita

पावसापासून बचाव करण्यासाठी शेतकऱ्यांनी अंगावर ताडपत्री घेतली. एका ताडपत्रीत तेजस मेश्राम, कृष्णा मेश्राम, सूर्यकांत पेंदोर, मनोज मेश्राम हे चौघेही शेतात बसून होते. त्याच वेळी वीज कोसळल्याने तेजस मेश्राम याचा मृत्यू झाला. तर कृष्णा सीताराम पेंदोर (वय २२), सूर्यकांत दत्ता पेंदोर (वय २३), मनोज बापूराव मेश्राम (वय ४०) सर्व रा. आयता (हेटी) हे जखमी झाले.

शेतात सुरू होते सोयाबीनची गंजी लावण्याचे काम; अंगावर वीज कोसळल्याने युवकाचा मृत्यू

sakal_logo
By
बबलू जाधव

आर्णी (जि. यवतमाळ) : शेतातील सोयाबीन काढणी केल्यावर गंजी लावत असताना वीज कोसळल्याने युवकाचा घटनास्थळीच मृत्यू झाला. तर तिघे जखमी झाल्याची घटना तालुक्यातील आयता (हेटी) येथे सोमवारी (ता. १९) दुपारी पाच वाजता दरम्यान घडली. तेजस नागोराव मेश्राम (वय १८, रा. आयता (हेटी) असे मृताचे नाव आहे.

प्राप्त माहितीनुसार, आयता (हेटी) येथे शेतात सोयाबीन कापणी व गंजी लावण्याचे काम दहाजणांची टोळी असणाऱ्या मजुरांनी घेतले होते. तीन दिवसांपूर्वी शेतातील सोयाबीन पीक कापून ठेवले होते. कापणी केलेल्या सोयाबीनला एकत्र गोळा करून गंजी लावण्यासाठी मजूर शेतात गेले होते. शेतात काम करीत असताना दुपारी साडेचार वाजता दरम्यान विजेच्या कडकडाटासह पावसाला सुरुवात झाली.

क्लिक करा - आता लायसन्ससाठी कुठेही जायची गरज नाही; घरबसल्या पुढील पद्धतीने काढा लर्निंग लायसन्स

पावसापासून बचाव करण्यासाठी शेतकऱ्यांनी अंगावर ताडपत्री घेतली. एका ताडपत्रीत तेजस मेश्राम, कृष्णा मेश्राम, सूर्यकांत पेंदोर, मनोज मेश्राम हे चौघेही शेतात बसून होते. त्याच वेळी वीज कोसळल्याने तेजस मेश्राम याचा मृत्यू झाला. तर कृष्णा सीताराम पेंदोर (वय २२), सूर्यकांत दत्ता पेंदोर (वय २३), मनोज बापूराव मेश्राम (वय ४०) सर्व रा. आयता (हेटी) हे जखमी झाले. जखमींना तत्काळ उपचारासाठी सावळी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले.

कृष्णा पेंदोरची प्रकृती गंभीर असल्याने त्याला पुढील उपचारासाठी यवतमाळला हलविण्यात आले. सोमवारी शवविच्छेदन करून तेजसचा मृतदेह नातेवाइकांकडे देण्यात आला. मृताच्या पश्‍चात आई, वडील, लहान भाऊ असा आप्तपरिवार आहे. या घटनेमुळे आयता (हेटी) येथे हळहळ व्यक्त होत आहे.

संपादन - नीलेश डाखोरे

loading image
go to top