महागाव येथील बँकेच्या कामासाठी जाणाऱ्या दोघांना ट्रकने उडविले, अपघातात दुचाकीस्वाराचा मृत्यू

रजत खाडे
Saturday, 31 October 2020


महागाव तालुक्‍यातील माळवागद येथील रहिवासी असलेले खुशाल गबा जाधव (वय ३२) व ओंकार कैलास जाधव (वय २०) हे दोघेही आपल्या दुचाकीने (क्रमांक एमएच २९ बीके ४२८३) महागाव येथे बॅंकेच्या कामासाठी येत होते. त्याचवेळी खडका येथील उड्डाण पुलावर त्यांच्या मोटारसायकलला समोरून केळी घेऊन आलेल्या ट्रकने (क्रमांक डी.एल. १ जीसी ३७६५) जबर धडक दिली.

महागाव (जि. यवतमाळ) : तालुक्‍यातून जाणाऱ्या नागपूर-बोरी-तुळजापूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ३६१ वरील खडकानजीक असलेल्या उड्डाण पुलावर ट्रक व दुचाकीची समोरासमोर धडक झाली. या अपघातात दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू झाला; तर एक तरुण गंभीर जखमी झाला आहे. हा अपघात शनिवारी (ता. ३१) सकाळी अकराच्या सुमारास घडला.

महागाव तालुक्‍यातील माळवागद येथील रहिवासी असलेले खुशाल गबा जाधव (वय ३२) व ओंकार कैलास जाधव (वय २०) हे दोघेही आपल्या दुचाकीने (क्रमांक एमएच २९ बीके ४२८३) महागाव येथे बॅंकेच्या कामासाठी येत होते. त्याचवेळी खडका येथील उड्डाण पुलावर त्यांच्या मोटारसायकलला समोरून केळी घेऊन आलेल्या ट्रकने (क्रमांक डी.एल. १ जीसी ३७६५) जबर धडक दिली.

जाणून घ्या : यवतमाळ पोलिसांची उडाली झोप! सहायक पोलिस निरीक्षकाची पिस्टल चोरणारा आठवडा उलटूनही मोकळाच

ट्रकने शंभर मीटर फरफटत नेली दुचाकी

या धडकेत दुचाकीवरील खुशाल जाधव हा तरुण जागीच ठार झाला, तर ओंकार हा गंभीर जखमी झाला आहे. हा अपघात एवढा भीषण होता की, त्यामध्ये मोटारसायकल ट्रकच्या समोरच्या भागात अडकून जवळपास शंभर मीटर फरफटत गेली.

ट्रकचालकाचे पलायन

दरम्यान, अपघातानंतर नागरिकांनी अपघातस्थळी एकच गर्दी केली होती. जखमी ओंकार जाधव याला नागरिकांनी उपचारासाठी रुग्णालयात हलविले. अपघात घडताच ट्रकचालक ट्रक सोडून पळून गेल्याची माहिती आहे.

अवश्य वाचा : आई जेवनाचा डबा घेऊन घरी आली; मात्र, मुलाला गळफास घेतलेल्या अवस्थेत बघून फोडला हंबरडा

मृतदेह शवविच्छेदनासाठी रवाना

अपघाताची माहिती कोसदनी येथील महामार्ग पोलिस केंद्राला मिळाल. पोलिस उपनिरीक्षक विठ्ठल दुरपडे, महागावचे ठाणेदार दामोदर राठोड, पोलिस वाहनावरील चालक प्रवीण इंगोले, महामार्ग पोलिस कर्मचारी रूपेश तिजारे, गुणवंत बोईनवाड, मधुकर राठोड यांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. त्यानंतर मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी सवना येथील ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आला. दरम्यान, या अपघाताचा पुढील तपास पोलिस करीत आहेत.

 

(संपादन : दुलिराम रहांगडाले)

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Youth dies in truck-bike accident