चंद्रपूर: युवकाचा नदीत बूडून मृत्यू

जवाहर धोडरे
शनिवार, 12 मे 2018

मृतकाने पोंभूर्णा येथे रेडीमेड कपड्याचे मागील काही दिवसांपूर्वी दूकान सुरु केले होते. मात्र गावातील युवा मित्राचे लग्न आटोपून येत असतांना उन्हाच्या तीव्र झळा सहन न झाल्याने नदीत आंघोळ करुन गावाला परतत असतांना बूडून मृत्यू झाला.परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

पोंभूर्णा जि. चंद्रपूर : मूल तालुक्यातील कांतापेठ येथील एका युवकाचे लग्न आज गडचिरोली जिल्ह्यातील चामोर्शी तालुक्यातील गणपूर येथे होते. गावातील आपल्या काही मित्रांसह मुन्ना चौधरी (वय 25) हे लग्न आटोपून घाटकूळ येथून येत असताना नदीत बूडून मृत्यू पावल्याची घटना शुक्रवारी सायंकाळी पाचच्या सुमारास घडली.

त्याच्या समवेत असलेल्या काहींनी ही माहीती दिल्याने ही बातमी पसरली. पोंभूर्णा पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करित प्रेत हस्तगत करुन उत्तरिय तपासणीसाठी मूलला पाठविल्याची माहिती ठाणेदार सुधीर बोरकूटे यांनी दिली.

मृतकाने पोंभूर्णा येथे रेडीमेड कपड्याचे मागील काही दिवसांपूर्वी दूकान सुरु केले होते. मात्र गावातील युवा मित्राचे लग्न आटोपून येत असतांना उन्हाच्या तीव्र झळा सहन न झाल्याने नदीत आंघोळ करुन गावाला परतत असतांना बूडून मृत्यू झाला.परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

Web Title: youth drown in river Chandrapur

टॅग्स