

Electric Shock
sakal
संग्रामपूर : शेतातून गेलेल्या १३३ केव्ही विद्युत वाहिनी मधील उघड्या वायर मधून शेतात चरणाऱ्या बकऱ्यांना हाकलण्यासाठी गेलेला २८ वर्षीय युवकाला विद्युत शॉक लागला. यामध्ये त्याचा जागीच मृत्यू झाला. तर त्याला वाचवण्यासाठी धावलेला मित्र गंभीर जखमी झाला. या हृदयद्रावक घटनेने गावात शोककळा पसरली.या घटनेमुळे संतप्त ग्रामस्थांनी वीज महावितरण प्रशासनाचे विरोधात रस्तारोको आंदोलन छेडले.