esakal | Video :त्यांना दिसला भुकेल्यांमध्येच देव! लंचबॉक्‍स उपक्रमातून पुरविले हजारोंना जेवण
sakal

बोलून बातमी शोधा

lunch box.

गरजू व गरीब नागरिक अन्नापासून वंचित राहू नये, यासाठी येथे लंचबॉक्‍सचा उपक्रम सुरू करण्यात आला. या उपक्रमाने 50 हजारांचा टप्पा गाठला आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात नागरिकांची भूक भागविणारा हा आजवरचा सर्वांत मोठा उपक्रम असल्याचे मानले जाते.

Video :त्यांना दिसला भुकेल्यांमध्येच देव! लंचबॉक्‍स उपक्रमातून पुरविले हजारोंना जेवण

sakal_logo
By
शेखर चौधरी

मोर्शी (जि.अमरावती) : कोरोनाचे संकट मानवाची परीक्षा पाहणारेच आहे. मात्र अशातही माणुसकी जिंकली आहे. आपआपल्या अडीअडचणींचर मात करीत अनेकांनी या काळात समाजसेवेचा वसा जपला. गोरगरींबाना अन्न पुरविले, मुक्‍या प्राण्यांची काळजी घेतली. त्यातलाच एक लंचबॉक्‍स हा महत्त्वाचा उपक्रम. मोर्शी येथे राबविण्यात आलेल्या या उपक्रमाने गरजुंची दोन वेळची भूक भागविली.
कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी सर्वत्र लॉकडाउन घोषित करण्यात आल्याने एकही निराधार, वयोवृद्ध तसेच गरजू व गरीब नागरिक अन्नापासून वंचित राहू नये, यासाठी येथे लंचबॉक्‍सचा उपक्रम सुरू करण्यात आला. या उपक्रमाने 50 हजारांचा टप्पा गाठला आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात नागरिकांची भूक भागविणारा हा आजवरचा सर्वांत मोठा उपक्रम असल्याचे मानले जाते.

मोर्शीमधील तरुणांनी आपली मोर्शी लंचबॉक्‍स हा व्हॉट्‌सऍप गृप तयार करून शहरातील गरजवंतांना दररोज सकाळी व रात्री घरपोच जेवण पुरविण्याचे कार्य सुरू केले होते. दररोज अंदाजे 1200 लंचबॉक्‍सचे स्वयंसेवकांकडून वाटप केले जात आहे. या आपली मोर्शी लंचबॉक्‍सच्या गृपने व्हॉट्‌सऍप तयार करून नागरिकांना मदतीचे आवाहन केले होते. त्यानुसार अनेक नागरिकांनी धान्य, तेल, मीठ, तिखट, भाजीपाला देऊन त्यांना आर्थिक मदत सुरू केली. जमा झालेल्या निधीतून गृपच्या युवकांनी साबू मंगल कार्यालय येथे जेवण तयार करण्यास सुरुवात केली. जवळपास पंचवीस स्वयंसेवक युवक श्रमदानाच्या माध्यमातून गरजू लोकांना घरपोच दोन वेळच्या जेवणाचे बॉक्‍स पोहोचून देत आहेत. ही संकल्पना नीलेश रोडे, शेख गनी शेख सुलतान, प्रतीक वसंत, नीरज वसंत, हितेश उपासे, गौरव उपासे, शेरखान यांची असून या उपक्रमाला विविध सेवाभावी संघटनांचा हातभार लागत आहे.
आतापर्यंत मोर्शी शहरातील नागरिकांना 47 हजार लंचबॉक्‍स व इतर जिल्ह्यांतून पायदळ किंवा ट्रकद्वारे आलेल्या तीन हजार मजुरांना लंचबॉक्‍स देण्यात आले. विशेष म्हणजे या उपक्रमातून कधी पनीर, श्रीखंड तसेच पुरणपोळीचे जेवणसुद्धा देण्यात आले.

सविस्तर वाचा - अल्पवयीन मुलीचे अपहरण करून चौघांनी पाजली दारू, पुढे काय झालं वाचा...
स्वच्छतेला महत्त्व
कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये, यासाठी आयोजकांनी शिस्त पाळण्यासोबतच मास्क लावणे, सोशल डिस्टन्सिंग ठेवणे, स्वच्छता राखणे तसेच वेळोवेळी हात धुण्याचीसुद्धा व्यवस्था केली. यासोबतच सामाजिक कार्य म्हणून मास्कचे वाटपसुद्धा केले.

loading image
go to top