Flood Accident: नांद नदीत दुचाकीसह युवक वाहून गेला; बचावकार्य सुरूच, ओळख पटलेली नाही
Rain Alert: भिवापूर तालुक्यातील नांद नदीवरील पुलावरून दुचाकीसह युवक पुराच्या पाण्यात वाहून गेला. मुसळधार पावसामुळे परिसरातील नद्या-नाले तुडुंब भरले आहेत.
भिवापूर : परिसरात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे नद्या-नाले तुडुंब भरून वाहत आहेत. अशावेळी शनिवारी(ता.१६) सायंकाळी सुमारे सात वाजताच्या सुमारास चिखलापारजवळील नांद नदीच्या पुलावरून दुचाकीसह एक युवक पुराच्या पाण्यात वाहून गेला.