esakal | भाऊबीजेला उघडणार झाडीपट्टीतील रंगमंचाचा पडदा; शासनाच्या अटींची मर्यादा पाळण्याचे आव्हान 
sakal

बोलून बातमी शोधा

Zadipatti stage will be open after diwali festival

सरकारने परवानगी दिल्यानंतर सात महिन्यापासून बंद पडलेल्या झाडीपट्टीतील रंगमंचाचा पडदा येत्या भाऊबीजे पासून म्हणजे दिनांक 16 नोव्हेंबर पासून उघडणार आहे.  

भाऊबीजेला उघडणार झाडीपट्टीतील रंगमंचाचा पडदा; शासनाच्या अटींची मर्यादा पाळण्याचे आव्हान 

sakal_logo
By
संजीव बडोले

नवेगावबांध (जि. गोंदिया) : विदर्भातील भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली हा परिसर पूर्व विदर्भ म्हणून ओळखला जातो. सुमारे दीडशे वर्षापासून चालत आलेली पूर्व विदर्भातील झाडीपट्टी रंगभूमी ही हौशी रंगभूमी म्हणून प्रसिद्ध आहे. केवळ हौसेखातर रात्रभर नाटक सादर केले जाते. गेल्या वीस पंचवीस  वर्षांपासून ही हौशी रंगभूमी व्यावसायिक रंगभूमी म्हणून ओळखली जाते. 

सरकारने परवानगी दिल्यानंतर सात महिन्यापासून बंद पडलेल्या झाडीपट्टीतील रंगमंचाचा पडदा येत्या भाऊबीजे पासून म्हणजे दिनांक 16 नोव्हेंबर पासून उघडणार आहे.  सरकारने नाटक सादर करण्यासाठी परवानगी दिल्यामुळे झाडीपट्टी रंगभूमी चे मुख्य केंद्र असलेल्या देसाईगंज वडसा येथील नाट्य मंडळाची कार्यालय गेल्या सोमवारपासून बुकिंग करता खुली झाली आहेत. वडसा येथील सर्व प्रमुख नाट्य मंडळांकडे  दीडशे ते दोनशे नाट्यप्रयोगाचे  बुकिंग सुद्धा झाली असल्याची माहिती आहे. 

अधिक वाचा - शेतकऱ्यांना दिवाळी भेट; पीक नुकसानीचे २७ कोटी मिळाले

पूर्व विदर्भात विखुरलेले  त्या त्या नाट्य मंडळाचे कलाकार वडसा येथे डेरेदाखल झाले आहेत. सध्या जुन्याच नाटकाचे बुकिंग सुरु आहे. त्या मंडळाचे कलाकार आपल्या गाजलेल्या नाटकांच्या तालिमीत व्यस्त आहेत. नव्या नाटकाच्या तालमीला वेळ मिळाली नाही म्हणून, सध्या जुनीच नाटके सादर केली जाणार आहेत. पुढील वर्षी जानेवारीपासून नवी नाटके रंगमंचावर सादर करण्यात येतील. नव्या नाटकाच्या तालमी देखील लवकरच सुरू होणार आहेत. या रंगभूमीकडे सहरी कलाकार आर्थिक स्तोत्र म्हणून या रंगभूमीकडे बघतात त्यामुळे, पुणे नागपूर, मुंबई येथील काही मराठी चित्रपट व नाट्यकलावंतांनी झाडीपट्टी रंगभूमी कडे आपला मोर्चा वळविला आहे.

खुल्या जागेत  नाटके करण्याची परवानगी शासनाने पाच नोव्हेंबरला दिली आहे. 50 टक्के ची अटही घालण्यात आली आहे. नाटकाची बुकिंग करतानाच सोशल डिस्टन्स ची अट स्थानिक मंडळावर टाकण्यात आली आहे. नियम  पालनासाठी ची जबाबदारी  स्थानिक मंडळावर  टाकण्यात येत असल्याची माहिती,  झाडीपट्टी नाट्य अकादमीचे माजी अध्यक्ष  व नाट्यकलाकार  हिरालाल पेंटर यांनी सांगितले. तर शासनाने अटी घालून नाट्य प्रयोगांना परवानगी दिली आहे. पण झाडीपट्टी रंगमंचाचा  पडदा उघडणार असल्याने कलावंतांचे व रंगभूमीचे दिवस पालटणार आहेत. त्यामुळे कलावंत सुखावले आहेत. झाडीपट्टी रंगभूमीची  आर्थिक उलाढाल पुन्हा होणार आहे. असे झाडीपट्टी रंगभूमी निर्माता संघ वडसा चे कलावंत व निर्माता परमानंद गहाणे यांनी सांगितले.

झाडीपट्टीतील म्हणजे चंद्रपूर गडचिरोली भंडारा गोंदिया या पूर्व विदर्भात भाऊबीजेपासून मंडया भरत असतात. ज्या गावात मंडई असेल त्या गावात  हमखास नाटक असतेच.  परंतु कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर गेल्या सात-आठ महिन्यांपासून झाडीपट्टी रंगभूमी पूर्णता विस्कळीत झाली  होती. लॉक डाऊन मुळे अनेक नाट्यकलावंत, वेशभूषाकार, रंगमंच कार, हार्मोनियम,तबला ,ऑर्गन वादक यांचा रोजगार हरवला गेला होता. त्यामुळे या सर्वांवर उपासमारीची पाळी आली होती.

 कलावंत, कारागिरांपुढे उदरनिर्वाहाचा प्रश्न उभा झाला होता. झाडीपट्टी नाट्य मंडळाच्या शिष्टमंडळाने नाटकांना तात्काळ परवानगी द्यावी, यासाठी विधानसभा अध्यक्ष नानाभाऊ पटोले, राज्याचे पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांना प्रत्यक्ष भेटून  साकडे घातले होते.त्यांच्यासह थेट मंत्रालयात धाव घेतली होती. हे येथे उल्लेखनीय आहे. झाडीपट्टीत जवळपास पाच हजार कलाकार या रंगभूमीवर अवलंबून आहेत. मंडई निमित्त होणाऱ्या कार्यक्रमांना नाटक, तमाशा, गोंधळ, दंडार, लावणी नृत्य, भजन स्पर्धा अशा कार्यक्रमांची रेलचेल असते. या कार्यक्रमाच्या माध्यमातून मनोरंजनाबरोबरच जनजागृती व समाज प्रबोधनाचे काम केले जाते. 

कोरोनाच्या संसर्गामुळे या सर्वच कलावंतावर उपासमारीची पाळी आली होती. कित्येकाची संसार उघड्यावर येण्याच्या मार्गावर होती. नाटका वरची बंदी उठवून सरकारने परवानगी दिल्यामुळे, या कलावंतांच्या जीवनाला नवी उभारी मिळाली आहे. स्थानिक आमदारांपासून तर शासनापर्यंत झाडीपट्टी नाट्य मंडळाचे पदाधिकारी अनिरुद्ध वनकर, चेतन वडगाये, किरपाल सयाम, संदेश आनंदे यांनी थेट मंत्रालयात धाव घेतली होती. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित दादा पवार, बांधकाम मंत्री अशोक चव्हाण, सांस्कृतिक मंत्री अमित देशमुख यांना  निवेदने दिली होती. 

नामदार पटोले व नामदार वडेट्टीवार यांना प्रत्यक्ष भेट घेऊन लॉक डाऊन मुळे, कलावंतावर उद्भवलेल्या परिस्थितीची जाणीव करून दिली होती. हे येथे उल्लेखनीय आहे. आता मंडई भरवण्यासाठी व नाटकांच्या आयोजनासाठी स्थानिक प्रशासन, पोलीस विभाग व जिल्हा प्रशासन काय भूमिका घेतात? याकडे झाडीपट्टीच्या नाट्य रसिकांचे व रसिक नागरिकांचे लक्ष लागले आहे.

हेही वाचा - घरी सरणाची तयारी अन्‌ मृत महिला अचानक झाली जिवंत; उपस्थितांच्या अंगाचा उडाला थरकाप

शासनाने नाटकाला परवानगी देताना ज्या अटी शर्ती  घातल्या आहेत, त्याच झाडीपट्टी रंगभूमी ला मारक आहेत. शहरी रंगभूमी पेक्षा झाडीपट्टी रंगभूमी वेगळी आहे. आपल्या नाटका खुल्या रंगमंचावर होतात. त्यामुळे अटी जाचक ठरतात. नाटक कंपन्या चे रेट वाढले आहेत, त्यामानाने तिकीटाचे रेट वाढवले तर प्रेक्षक नाटक पाहायला येणार नाही. त्याचा फटका स्थानिक आयोजक मंडळांना बसेल. पन्नास टक्क्यांच्या अटीचे पालन करणे शक्य नाही, त्यामुळे नाटकाला आवश्यक प्रेक्षक मिळणार नाहीत. त्याचा आर्थिक फटका स्थानिक मंडळांना बसेल, म्हणून शासनाने याची जबाबदारी स्थानिक मंडळावर सोडावी.
-डॉ. परशुराम खुणे, 
ज्येष्ठ नाट्यकलावंत, माजी सदस्य चित्रपट परीक्षण मंडळ मुंबई.

संपादन - अथर्व महांकाळ