

ZP School Uniform Delay
esakal
हिंगणी : 'गुरुजी सांगा ना हो आम्हाला गणवेश कधी मिळणार?' असा सवाल जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकणाऱ्या चिमुरड्यांच्या पालकांच्या तोंडून वारंवार ऐकायला मिळत आहे. शाळा सुरू होऊन निम्मे सत्र संपत आले आहे, तरीही शासनाकडून विद्यार्थ्यांना मिळणारे दोन जोड गणवेश, तसेच बुटांचे आणि पायमोज्यांचे पैसे अद्यापही शाळा किंवा शाळा व्यवस्थापन समितीच्या निवडलेल्या दुकानदाराच्या खात्यात पूर्णपणे जमा झालेले नाहीत.
शासन नियमांनुसार विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात किंवा थेट दुकानदाराच्या खात्यात गणवेश व साहित्याची रक्कम जमा होणे अपेक्षित असते. मात्र, अर्धसत्र संपत आले तरी केवळ एकाच गणवेशाची किंवा अपुरी रक्कम जमा झाल्यामुळे ग्रामीण भागातील चिमुरड्यांना अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत दिवस काढावे लागत आहेत. शाळेत खेळताना, धावताना मुले गणवेश मळवून टाकतात. परंतु, दोन जोड गणवेश मिळणे दूरच, वेळेवर एकच गणवेश उपलब्ध होत असल्यामुळे विद्यार्थ्यांना नाईलाजाने तोच मळका गणवेश दुसऱ्या दिवशीही घालून शाळेत यावे लागते.
मुलांबाबत पुन्हा 'प्रशासकीय उदासीनता' ग्रामीण भागात जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये प्रामुख्याने शेतकरीपुत्र, शेतमजूर आणि गोरगरीब वस्त्यांमधील मुले शिक्षण घेतात. दारिद्र आणि संघर्ष या त्यांच्या पाचवीला पुजलेला असतो. रोजच्या जगण्यासाठी संघर्ष करणाऱ्या या पालकांनी दिवसभर शेतात मजुरी करायची की मुलांच्या कपड्यांकडे लक्ष द्यायचे, असा प्रश्न निर्माण झाला आहे. शासनाला दोन्ही गणवेश एकाच वेळेस उपलब्ध करून देण्यास काय अडचण आहे? पालकांना आणि विद्यार्थ्यांना अशा प्रकारे ताटकळत ठेवण्या मागचे कारण काय, असा संतप्त सवाल यानिमित्ताने उपस्थित होत आहे.
बालकांच्या हक्कांवर टाच वेळेवर गणवेश न मिळाल्यामुळे विद्यार्थ्यांच्या आत्मविश्वासावर आणि स्वाभिमानावर परिणाम होत असून, शिक्षण विभागाची अनास्था यात प्रकर्षाने दिसून येत आहे. शासनाने आणि शिक्षण विभागाने या गंभीर बाबीची तत्काळ दखल घेऊन उर्वरित गणवेशाचा निधी त्वरीत वितरीत करावा, अन्यथा पालकांच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा ग्रामीण भागातील पालकांकडून दिला जात आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.