अहिल्यानगरच्या सहकार राजकारणात सध्या मोठ्या घडामोडी घडताना दिसत आहेत. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सत्तासमीकरणात विखे आणि थोरात यांच्यातील सहमतीची चर्चा सुरू असतानाच खासदार नीलेश लंके यांनी या राजकीय समीकरणाला आव्हान देण्याचे संकेत दिले आहेत. जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर डॉ. सुजय विखे पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. या भेटीमुळे सहकार क्षेत्रातील राजकीय हालचाली, जिल्हा बँकेच्या आगामी कारभाराला मिळणारे संभाव्य सरकारी पाठबळ आणि विखे-थोरात यांच्यातील सहमतीचे भवितव्य याबाबत चर्चा रंगली आहे. दुसरीकडे, नीलेश लंके या सत्तासमीकरणासमोर कोणती रणनीती आखणार, याकडेही राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. अहिल्यानगरच्या सहकार राजकारणात पुढे कोण बाजी मारणार, याचा आढावा या व्हिडीओतून घेणार आहोत..
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.