Ahmednagar District Bank : विखे, कोल्हे की राजळे? अहिल्यानगर जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदासाठी राजकीय रस्सीखेच!

अहिल्यानगर जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदासाठी सुजय विखे, बिपीन कोल्हे आणि मोनिका राजळे यांच्या नावांची चर्चा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कोणाला संधी देणार?

अहिल्यानगर जिल्हा सहकारी बँकेची निवडणूक पार पडल्यानंतर आता अध्यक्षपदाच्या निवडीकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. विखे आणि थोरात गटांनी एकत्र येत सहकाराची मोट बांधली असून 21 पैकी 18 संचालकांचे पाठबळ मिळवले आहे. मात्र, अध्यक्षपदासाठी भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. सुजय विखे पाटील, बिपीन कोल्हे आणि आमदार मोनिका राजळे यांच्या नावांची चर्चा सुरू आहे. दुसरीकडे आमदार आशुतोष काळे आणि माजी मंत्री शंकरराव गडाख यांचीही दावेदारी चर्चेत आहे. विशेष म्हणजे, अध्यक्षपदाचा अंतिम निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस घेतील, असे विधान सुजय विखे यांनी केले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सहकार क्षेत्रातील राजकीय समीकरणांना नवे वळण मिळाले आहे. 12 नोव्हेंबर रोजी होणाऱ्या संचालक मंडळाच्या पहिल्या बैठकीत अध्यक्ष आणि उपाध्यक्ष निवडले जाणार आहेत. भाजपमधील कोणत्या नेत्याला संधी मिळणार, मित्रपक्षांना अध्यक्षपद मिळणार की फडणवीस धक्कादायक निर्णय घेणार, याची उत्सुकता निर्माण झाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

Uday Singh Patil-Udalkar Wins Karad Society Group Election
Sangli District Bank Election
Sangli District Bank election candidates list
Sangli District Central Cooperative Bank election latest news