Sujay Vikhe यांनी आमदारांकडे काय मागणी केली? | Ahilyanagar | Shivaji Kardile

सुजय विखे खरं बोलून गेले अन् सभागृहात एकच हशा पिकला...

लोकसभा निवडणुकीत पराभूत झालेल्या अहिल्यानगर येथील भाजपचे माजी खासदार सुजय विखे पाटील यांनी भाजप आमदारांच्या सत्कार समारंभात आपल्या पुनर्वसनाची मागणी केली आहे. नगर शहरात भाजप आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या वतीने जिल्ह्यातील महायुतीतील निर्वाचित आमदारांचा सत्कार करण्यासाठी एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या सत्कार समारंभासाठी जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, विधान परिषद सभापती राम शिंदे यांच्यासह महायुतीच्या दहा पैकी आठ आमदार उपस्थित होते. नगर शहरातील सहकार सभागृहात झालेल्या या कार्यक्रमात जिल्हाभरातील महायुतीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमात माजी खासदार सुजय विखे यांचा देखील सत्कार करण्यात आला. भाषण करत असताना, सुजय विखे यांनी महायुतीच्या आमदारांना विनंती केली की, त्यांचे पुनर्वसन करण्यात यावे. त्यांच्या विनंतीला प्रतिसाद देताना, सर्व आमदारांनी असे आश्वासन दिले की, महायुतीच्या जिल्ह्यातील यशामध्ये विखे यांचा मोठा सहभाग असल्याने त्यांचे पुनर्वसन नक्कीच होईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com