अजित पवारांच्या राष्ट्रवादीतला अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे. आमदार संग्राम जगताप आणि आमदार इद्रिस नायकवाडी यांच्यातील वाद शिगेला पोहोचला. संग्राम जगताप यांच्या राजीनाम्याची मागणी नायकवाडी यांनी केल्यानंतर जगताप चांगलंच भडल्याचं पहायला मिळालं. 'नायकवाडींना माझा त्रास होतोय, पण जेव्हा अबू आझमी यांनी पंढरपूरच्या वारीबद्दल अपमानकारक वक्तव्य केलं, तेव्हा नायकवाडी गप्प का होते? मात्र तसं न होता नायकवाडी यांना इतर समाजाचा व्यक्ती सलतोय' अशी जहरी टीका जगताप यांनी केली. या दोघांच्या वादावर आता अजित पवार काय तोडगा काढतात हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.