राज्याचे उपमुख्यमंत्री Ajit Pawar यांचे २८ जानेवारी रोजी विमान अपघातात दुर्दैवी निधन झाले. मुंबईहून बारामतीकडे जात असताना बारामती विमानतळाजवळ Learjet 45 हे खासगी विमान कोसळले. या भीषण दुर्घटनेत अजित पवार यांच्यासह एकूण पाच जणांचा मृत्यू झाला. दरम्यान, या अपघाताचा तपास सध्या Aircraft Accident Investigation Bureau (AAIB) कडून सुरू आहे. अपघाताच्या पार्श्वभूमीवर Maharashtra Airport Development Company Limited (MADC) यांनी बारामती विमानतळाचे ऑडिट केले असता काही धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत. ऑडिट अहवालानुसार, बारामती विमानतळावर विविध नियमांचे उल्लंघन झाल्याचे निदर्शनास आले आहे. विशेष म्हणजे, संबंधित त्रुटींबाबत वेळोवेळी अहवाल सादर करूनही आवश्यक ती कारवाई करण्यात आलेली नसल्याचे समोर आले आहे. नेमक्या कोणत्या नियमांचे उल्लंघन झाले? सुरक्षाविषयक उपाययोजनांमध्ये कोणत्या त्रुटी आढळल्या? आणि संबंधित अधिकाऱ्यांवर काय कारवाई होणार? या सर्व प्रश्नांची उत्तरे आता तपास अहवालातून समोर येणार आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.