अकोल्यातील गवळी समाजाचे प्रदेशाध्यक्ष आणि प्रॉपर्टी व्यावसायिक किसनराव हूंडीवाले यांच्या हत्येप्रकरणाचा निकाल अखेर जिल्हा सत्र न्यायालयात लागला आहे. आज या प्रकरणातील अंतिम युक्तिवाद पार पडला असून न्यायालयाने तब्बल 15 आरोपींपैकी 10 जणांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. 6 मे 2019 रोजी अकोल्यातील पोलीस अधिक्षकांच्या शासकीय बंगल्यालगत असलेल्या सार्वजनिक न्यास उपनिबंधक कार्यालयात किसनराव हूंडीवाले यांची दिवसाढवळ्या हत्या करण्यात आली होती. या रक्तचिटकलेल्या हल्ल्यानंतर अकोला जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली होती. या प्रकरणातील मुख्य आरोपींमध्ये अकोल्याच्या भाजपच्या पहिल्या महापौर सुमन गावंडे यांच्या कुटुंबातील पाच सदस्यांचा समावेश आहे. यात सुमन गावंडे यांचे पती, निवृत्त पोलीस निरीक्षक श्रीराम गावंडे आणि मुलालाही न्यायालयाने जन्मठेप ठोठावली आहे. सरकारी पक्षातर्फे वरिष्ठ वकील उज्वल निकम यांनी युक्तिवाद केला. न्यायालयाने ठोस पुरावे आणि साक्षांच्या आधारे 10 आरोपींना दोषी ठरवत जन्मठेपेची शिक्षा सुनावली तर फारसे ठोस पुरावे नसल्यामुळे उर्वरित पाच जणांची निर्दोष मुक्तता करण्यात आली. या निकालामुळे पाच वर्षे जुने झालेले हे हत्याकांड प्रकरण न्यायालयीन टप्प्यांतून महत्वपूर्ण निष्पत्तीला पोहोचले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.