Pune Land Scam: Damania भडकल्या, Amedia कंपनीवर गुन्हे दाखल करण्याची मागणी | Parth Pawar | Ajit Pawar | Sakal News

Anjali Damania On Pune Land Controvercy: 'दोनदा मुदतवाढ मागूनही अमेडिया कंपनीचा स्टॅम्प ड्युटी भरण्यास स्पष्ट नकार; कंपनीवर दिवाणी व फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणी, दहापट रकमेची वसुली तसेच दंडात्मक वसुलीसाठी कंपनीची आणि संबंधित खासगी मालमत्तेची कलेक्टरमार्फत जप्ती व्हावी..'

अमेडिया कंपनीनं स्टॅम्प ड्युटी भरण्यासाठी दोनदा मुदतवाढ घेतल्यानंतरदेखील ती रक्कम न भरता थेट नकार दिल्याचा गंभीर आरोप सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केला आहे. या प्रकरणात कंपनीवर दिवाणी तसेच फौजदारी गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी त्यांनी प्रशासनाकडे केली. दमानिया म्हणाल्या की, 'कायद्यानुसार स्टॅम्प ड्युटी न भरल्यास दहापट रकमेची वसुली करण्याचा अधिकार प्रशासनाकडे आहे. त्यामुळे अमेडिया कंपनीकडून दहापट रक्कम तात्काळ वसूल करावी.' तसेच, दंडात्मक वसुलीची प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी कंपनीसोबतच संबंधित खासगी मालमत्तांवरही कलेक्टरांनी जप्तीची कारवाई करावी, अशी ठाम मागणी त्यांनी केली. अमेडिया कंपनीच्या नकारानंतर हे प्रकरण अधिक तीव्र होण्याची शक्यता असून, प्रशासनाकडून पुढील निर्णयाची प्रतीक्षा आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com