Pandharpur Ashadhi Ekadashi । यंदा खास काय, व्हिडीओ नक्की बघा । wari 2025

Ashadhi Ekadashi 2025: आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरात भक्तांचा महापूर; २२ लाखांहून अधिक भाविक विठ्ठल-रुक्मिणीच्या दर्शनासाठी पंढरीत दाखल, चंद्रभागा स्नानासाठी पहाटेपासून गर्दी, टाळ-मृदुंगाच्या गजरात संपूर्ण नगरी भक्तिमय, मठ-मंदिरांत विठूनामाचा जयघोष..

आज पवित्र आषाढी एकादशीच्या दिवशी पंढरपूर नगरी भक्तांच्या उत्साहाने भारावून गेली आहे. देशाच्या कानाकोपऱ्यातून आलेले लाखो भाविक विठ्ठल-रुक्मिणीच्या दर्शनासाठी पंढरीत दाखल झाले असून, संपूर्ण शहर टाळ-मृदुंगाच्या गजरात दुमदुमले आहे. पहाटेपासूनच चंद्रभागा नदीच्या घाटांवर स्नानासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती. आज पंढरपूरमध्ये सुमारे २० ते २२ लाखांहून अधिक भाविकांनी उपस्थिती दर्शवली आहे. पंढरीतील मठ, मंदिरं आणि गल्लीबोळांमध्ये विठोबाच्या नावाचा अखंड जयघोष सुरु असून, वातावरण भक्तिरसाने भरून गेलं आहे. या भव्य आणि पवित्र सोहळ्याचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी सचिन जाधव यांनी.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com