Pune news: शेतकऱ्याने पिकातून साकारले ज्ञानेश्वर माऊली । Ashadhi Ekadashi 2025

Ashadhi Ekadashi News: मुळशी तालुक्यातील वातुंडे येथील कुटूंबाने शेतात साकारली संत ज्ञानेश्वरांची भव्य मूर्ती.. ४० गुंठ्यांच्या माळरानात तब्बल २०० फूट लांब आणि १५० फूट रुंद आकारात ही मूर्ती तयार.. शेतकरी कुटुंबाकडुन शेती आणि श्रद्धेचा अनोखा संगम..

मुळशी तालुक्यातील वातुंडे येथील शेतकरी कुटुंबाने शेती आणि श्रद्धेचा अनोखा संगम साधत एक अद्भुत कलाकृती साकारली आहे. शेतकरी महादेव राघू शिंदे आणि नामदेव राघू शिंदे यांच्या शेतात नाचणीच्या पिकातून संत ज्ञानेश्वरांची भव्य मूर्ती साकारण्यात आली आहे. ही कलात्मक निर्मिती महादेव शिंदे यांचे पुत्र बाळकृष्ण शिंदे आणि सून लक्ष्मी शिंदे यांनी केली असून, त्यांनी चाळीस गुंठ्यांच्या माळरानात तब्बल २०० फूट लांब आणि १५० फूट रुंद आकारात ही मूर्ती तयार केली आहे. गेल्या बावीस दिवसांपूर्वी त्यांनी नाचणीचे बियाणे पेरले आणि त्या हिरव्या रोपांपासून संत ज्ञानेश्वरांच्या मूर्तीचा आकार साकारला. गळ्यातील हारासाठी मेथीच्या बियांचा, तर मूळ मातीचा तपकिरी रंग मूर्तीच्या सौंदर्यात भर घालतो. झेंडूच्या फुलांनी ज्ञानेश्वरीचा आकार अधोरेखित करण्यात आला आहे, तर हारातील गुलाबी भागासाठी चाळीस किलो गुलाबाच्या पाकळ्यांचा वापर करण्यात आला आहे. शेती, कला आणि भक्ती यांचा एकत्रित संगम घडवणारी ही कलाकृती सध्या परिसरात चर्चेचा विषय ठरत असून, अनेक भक्त आणि नागरिक या अनोख्या मूर्तीचे दर्शन घेण्यासाठी शेतात भेट देत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com