Ayush Komkarचे मारेकरी Andekar toli ला तिकीट, Ajit Pawar च्या माणसाविरुद्ध पोलिसात तक्रार | Sakal News

Pune Andekar News: १८ वर्षांच्या आयुष कोमकरच्या हत्येनंतर आईचा आक्रोश; आंदेकर टोळी तुरुंगात असतानाही माजी नगरसेवक आंदेकरांना अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून तिकीट देण्याची तयारी? न्यायासाठी कल्याणी कोमकर आक्रमक, थेट दादांना सवाल करत पोलिसांना लिहिलं पत्र, नेमकं काय आहे मागणी?

आयुष कोमकर हत्या प्रकरणानं पुन्हा एकदा वातावरण तापवलं आहे. गोळ्या घालून निर्घृणपणे हत्या करण्यात आलेल्या आयुष कोमकरची आई कल्याणी कोमकर यांचा आक्रोश पाहायला मिळाला. आपल्या १८ वर्षांच्या मुलाचा घराच्या पार्किंगमध्येच खून झाल्याची वेदना व्यक्त करत कल्याणी कोमकर यांनी भावनिक हंबरडा फोडला आहे. या प्रकरणात धक्कादायक बाब म्हणजे आयुषची हत्या त्याच्याच सख्ख्या बापाने आणि भावांनी मिळून केल्याचा आरोप आहे. या हत्येमागे असलेली आंदेकर टोळी सध्या तुरुंगात आहे. मात्र, या टोळीशी संबंधित आणि माजी नगरसेवक असलेले आंदेकर पुन्हा एकदा निवडणूक लढवण्याच्या तयारीत असून, तेही अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून तिकीट मिळवण्याच्या हालचाली सुरू असल्याचं बोललं जात आहे. याच पार्श्वभूमीवर आयुष कोमकरची आई कल्याणी कोमकर आक्रमक झाल्या आहेत. त्यांनी थेट उपमुख्यमंत्री अजित पवार यांना लक्ष्य करत, “माझ्या मुलाला न्याय द्या, त्याच्या मारेकऱ्यांशी संबंधित व्यक्तींना राजकीय पाठबळ देऊ नका,” अशी भावनिक मागणी केली आहे. यासाठी त्यांनी पोलिसांना लेखी पत्रही दिलं असून, त्यात नेमकं काय म्हटलं आहे, याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे. एका आईचा आक्रोश, न्यायाची मागणी आणि राजकारणात होणाऱ्या हालचालींमुळे हे प्रकरण पुन्हा चर्चेच्या केंद्रस्थानी आलं असून, पुढे काय घडणार याकडे सर्वांचं लक्ष आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

Sunetra Pawar Brings Big Gift for Baramati Announces Development Projects and Emotional Tribute to Ajit Pawar
First full size statue of Ajit Pawar in Baramati
Ajit Pawar
Sunetra Pawar
Marathi News Esakal
www.esakal.com