'राष्ट्रवादीच्या तीन बड्या नेत्यांच्या ED च्या फाईल भाजपकडे अडकल्यात' Bachchu Kadu घणाघाती टीका | Sakal News

Ajit Pawar Passed Away: अजित पवारांच्या अंत्यविधीला चार दिवसही उलटले नाहीत तोच राजकीय आरोपांची सरबत्ती; ‘राष्ट्रवादीतील तीन मोठे नेते भाजपाच्या इशाऱ्यावर, ED फाईल्स अडकल्या’ म्हणत बच्चू कडूंनी शपथविधी व त्यानंतरच्या घडामोडींवर घणाघाती भाष्य

अजित पवारांच्या निधनानंतर घडत असलेल्या राजकीय घडामोडींवर आमदार बच्चू कडू यांनी तीव्र शब्दांत प्रतिक्रिया दिली आहे. 'राष्ट्रवादी काँग्रेसचे तीन मोठे नेते जरी पक्षात असले, तरी ते भाजपच्या इशाऱ्यावर चालत आहेत. या तीन बड्या नेत्यांच्या ईडीच्या फाईल्स भाजपकडे अडकलेल्या आहेत,' असा आरोप त्यांनी केला. तसेच, 'आज झालेल्या शपथविधीमुळे अजितदादांबद्दल निर्माण झालेली सहानुभूती मागे पडताना दिसत आहे. अंत्यविधीला चार दिवसही पूर्ण झालेले नाहीत. अशा परिस्थितीत पुष्पगुच्छ घेऊन जायचं की सांत्वन करायला जायचं, हाच प्रश्न सामान्य नागरिकांना पडला आहे,' असे म्हणत बच्चू कडू यांनी सध्याच्या राजकीय वातावरणावर आणि सत्तास्थापनेवर परखड भाष्य केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com